Cm Eknath Shinde: 5G चा फायदा सगळ्या क्षेत्रात होऊन एक अमुलाग्र बदल घडेल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

गावगाडा
Updated Oct 01, 2022 | 16:25 IST

5g network launched: देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून एक मोठी क्रांती या देशभरामध्ये 5जी लॉन्चिंगच्या माध्यमातून होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

थोडं पण कामाचं
  • भारतात आज 5G सेवा (5G service) सुरू झाली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते ही सेवा लॉन्च करण्यात आली.
  • यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (State Chief Minister Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी मुंबई:  भारतात आज 5G सेवा (5G service) सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांच्या हस्ते ही सेवा लॉन्च करण्यात आली.  यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (State Chief Minister Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून एक मोठी क्रांती या देशभरामध्ये 5जी लॉन्चिंगच्या माध्यमातून होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
 
मुंबई पनवेल पुणे यासह महत्वाच्या शहरांमध्ये लवकरच 5जी सेवा सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी पनवेल मधील शाळा निवडली याचा अभिमान आहे. 5 जी मुळे इंटरनेट स्पीड वाढेल ॲक्युरसी वाढेल ऑनलाईन शिक्षणाच्या दर्जात वाढ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

अधिक वाचा- जेवल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' काम, बघता बघता व्हाल कंगाल

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण विकासाकडे जातो आणि 5जी चा मोठा फायदा शिक्षण, आरोग्य, शेती, बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या क्षेत्रात होऊन एक अमुलाग्र बदल घडेल.

महाराष्ट्र आपल्याला 1 ट्रिलियनकडे घेऊन जायचाय, देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हापरिषदेच्या शाळा डिजिटल करायच्या असून 5जी सेवेचा मोठा फायदा यासाठी होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी