[VIDEO] खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी, नोव्हेंबर महिन्यात होणार होतं लग्न

गावगाडा
Updated Oct 10, 2019 | 17:43 IST

Doctor killed due to pothole: पावसाळ्यामुळे रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्याने एका तरुणीचा बळी घेतला आहे. या तरुणीचं पुढील महिन्यात लग्न होतं. लग्नाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडली असताना तिच्यासोबत अपघात घडलाय

thane woman doctor died bhiwandi pothole next month marriage marathi news google batmya
[VIDEO] खड्ड्यांनी घेतला महिला डॉक्टरचा बळी, नोव्हेंबर महिन्यात होणार होतं लग्न 

थोडं पण कामाचं

  • खड्ड्यात पडून डॉक्टर तरुणीचा मृत्यू
  • पालघर जिल्ह्यातील घटना 
  • मृतक तरुणीचं पुढील महिन्यात होतं लग्न
  • लग्नाच्या शॉपिंगहून घरी परतत असताना घडला प्रकार

पालघर: संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळ्यामुळे रस्त्यांवर खड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. खड्ड्यामुळे वाहन चालकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असून वाहतूक कोंडीही होत आहे. त्यातच खड्ड्यामुळे एका तरुणीला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. मृतक तरुणी डॉक्टर असून तिचं पुढील महिन्यात लग्न होणार होतं.

डॉ नेहा शेख असं मृत तरुणीचं नाव आहे. डॉ. नेहाचं लग्न ठरलं होतं पुढील महिन्यात लग्न असल्याने नेहा खरेदीसाठी घराबाहेर पडली. आपल्या भावासोबत खरेदी करुन घरी परतत असताना खड्यात त्यांची दुचाकी आदळली आणि डॉ नेहा खाली पडली. त्याच दरम्यान मागून येणाऱ्या ट्रकखाली डॉ नेहा चिरडली गेली. या अपघातात नेहाचा मृत्यू झाला. तर आरोपी ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.

नेहा ही डॉक्टर होती आणि पालघर जिल्ह्यातील कुडूस गावात राहत होती. पुढील महिन्यात लग्न असल्याने डॉ नेहा या शॉपिंगसाठी ठाण्यात गेली होती. ठाण्यात शॉपिंग करुन नेहा घरी परतत असताना तिच्या गाडीला अपघात झाला. वाडा-भिवंडी मार्गावरील दुगाड फाट्याजवळ नेहाच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात नेहाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. डॉ नेहाच्या मृत्युने सर्वांनाच एक धक्का बसला आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाहीये. 

या घटनेनंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळापासून जवळच असलेल्या टोल नाक्यावर जमा झाले. तसेच संतप्त झालेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनगाव टोल नाका मध्यरात्री बंद केला. श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांनी दावा केला आहे की, यंदाच्या वर्षी खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. या प्रकरणी पीडब्ल्यूडी आणि रस्त्याची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...