शिंदे गटातील खासदारांची संख्या किती वाढणार?, गिरीश महाजनांनी सांगितला खरा आकडा

गावगाडा
Updated Nov 15, 2022 | 20:02 IST

Girish Mahajan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या गटात सामील होणाऱ्या शिवसेना आमदार-खासदारांची नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहेत. शिवसेनेचे 13 खासदार शिंदेंसोबत आहेत. त्यात आता आणखी आमदार संपर्कात असल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

थोडं पण कामाचं
  • गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट
  • शिंदे गटात आणखी खासदारांचा पाठिंबा
  • आणखी दोन खासदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात

नंदुरबार : राज्यात शिवसेनेचा सर्वात मोठा गट हा शिंदे गट असूनच लवकरच शिंदे गटातील खासदारांची संख्या 15 च्या घरात पोहोचणार, असा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला. (The number of MPs from the Shinde group will reach 15, says Girish Mahajan.)

अधिक वाचा : एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या उस्मानाबादेत आज आंदोलनाला फक्त 15 कार्यकर्ते, पहा व्हिडीओ

नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा शहरात आज जनजाती दिवासाच्या औचित्य साधून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले,  की एकनाथ खडसे यांना आपल्या कुटुंबातील लोकांच सर्व पदे मिळाली पाहिजेत. त्यांनी अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी आपल्यावर खोटा गुन्हाही दाखल केला आहे, आता आमची वेळ आली आहे. त्यांनी कायद्याला सामोरे जावे. जिल्हा दूध संघाचीही चौकशी सुरू आहे. त्यांनी पाच वर्षांत तेथे काय केले, काय नाय केले, हेही लवकरच जनतेसमोर येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी