Udayanraje Bhosale : शिवाजी महाराजांविरोधात वक्तव्यानंतर उदयनराजेंनी काढली राज्यपालांची लायकी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या शिवाजी महाराजांविरोधात वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. त्यांच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे.

Udayanraj was furious after the Governor's controversial statement
Udayanraje Bhosale : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनराजेंनी काढली लायकी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शिवाजी महाराजांविरोधात वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाची लाट
  • राज्यपाल आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात आंदोलन
  • उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर

मुंबई :   राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यांच्या निषेधार्थ राज्यभरात विरोधक रस्त्यावर उतरले आहे. यामध्ये आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेही यांनी उडी घेतली असून त्यांनी दोघांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. (Udayanraj was furious after the Governor's controversial statement)

अधिक वाचा : Supriya Sule : प्रत्येकाला टीका करण्याचा हक्क, साडीच्या विधानावर सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्राला देवासमान असणाऱ्या शिवरायांबद्दल हे असे बोलूच कसे शकतात. अशी सगळी वक्तव्य ऐकल्यानंतर चीड येते, संताप येतो...  यांनी लायकी आहे का शिवरायांवर बोलण्याची... यांची जीभ हासडली पाहिजे...", अशी रोखठोक भूमिका घेत उदयराजेंनी  राज्यपाल आणि त्रिवेदींची अक्कल काढली. 

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे कार्यकर्ते आज राज्यभरात आंदोलनामुळे राज्याचे राजकारण तापले. यामध्ये माजी खासदार संभाजीराजेंनीही उडी घेतलं. थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांचं खडेबोल सुनावले.

अधिक वाचा : NCP Protest : राष्ट्रवादीने आंदोलनात डमी राज्यापालांचे धोतर फेडले

राज्यपाल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करताय. यापूर्वीही त्यांनी शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबात विधाने केलीयत.  देवेंद्र फडणवीस त्यांना का पाठीशी घालत आहेत?  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही वादग्रस्त व्यक्ती महाराष्ट्रात का ठेवलीय, असा सवाल केला आहे. संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी