मुंबई: धनुष्यबाण शिंदे गटाला की ठाकरे गटाला याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र ही प्रतिक्षा अजूनही वाढणार आहे. कारण आता ही सुनावणी पुढच्या वर्षी म्हणजे 5 जानेवारी 2023 ला होणार आहे. शिवसेनेच्या पारंपरिक धनुष्यबाणासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये सध्या अटीतटीची लढाई सुरू आहे. दोन्ही पक्षांनी धनुष्यबाणावर दावा केला आहे.
अधिक वाचा- Pankaja Munde: पंकजा मुंडेंनी शेअर केल्या वडिलांसोबतच्या काही स्पेशल आठवणी
त्यासाठी न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे शिंदे तसंच ठाकरे गटाने 9 डिसेंबरला सगळे पुरावे सादर केले होते. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देतं याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. मात्र आज कोर्टात 5 ते 7 मिनिटंचं सुनवणी झाली आणि आता पुढील सुनावणी 5 जानेवारीला घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे दोन्ही गटाची प्रतिक्षा आता आणखी काही दिवस वाढली आहे.