Amravati murder: हत्येचे CCTV Footage, मारेकऱ्यांनी उमेशचा पाठलाग केल्याचे दिसते

umesh kolhe murder cctv footage of amravati murder case : महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या झाली. ही हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचे एक सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती आले आहे.

umesh kolhe murder cctv footage of amravati murder case
Amravati murder: हत्येचे CCTV Footage, मारेकऱ्यांनी उमेशचा पाठलाग केल्याचे दिसते  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Amravati murder: हत्येचे CCTV Footage, मारेकऱ्यांनी उमेशचा पाठलाग केल्याचे दिसते
  • उमेश कोल्हे यांनी व्हॉट्सअॅपवर निवडक ग्रुपमध्ये शेअर केलेला फॉरवर्डेड मेसेज नुपुर शर्मा यांच्या संदर्भातला
  • फार्मासिस्ट उमेश कोल्हे आणि टेलर कन्हैय्यालाल या दोघांच्या हत्येचा तपास एनआयएकडे

umesh kolhe murder cctv footage of amravati murder case : महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या झाली. ही हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचे एक सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती आले आहे. या फूटेजमध्ये मारेकरी फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांचा बाइकवरून पाठलाग करत असताना स्पष्ट दिसत आहेत. उमेश कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी एक फॉरवर्डेड मेसेज व्हॉट्सअॅपवर निवडक ग्रुपमध्ये शेअर केला होता. या मेसेजला उत्तर म्हणून उमेश कोल्हे यांची सहा जणांनी मिळून सुऱ्याने गळा चिरून हत्या केली. 

मोठी बातमी : अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश, अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे

उमेश कोल्हे यांनी व्हॉट्सअॅपवर निवडक ग्रुपमध्ये शेअर केलेला फॉरवर्डेड मेसेज नुपुर शर्मा यांच्या संदर्भातला होता. नुपुर शर्मा या भाजपच्या प्रवक्तेपदी असताना त्यांनी पैगंबराविषयी एक वक्तव्य केले होते. एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात (डीबेट शो) हे वक्तव्य करण्यात आले. या घटनेला काही दिवस झाल्यानंतर कार्यक्रमातील विशिष्ट भाग सोशल मीडियावर फिरवून एक वातावरण तयार करण्यात आले. हे प्रकरण शांत झाले असे वाटत असताना महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात आणि राजस्थानमध्ये उदयपूर येथे हत्येच्या घटना घडल्या महाराष्ट्रात उमेश कोल्हे आणि राजस्थानमध्ये टेलर असलेल्या कन्हैय्यालाल यांची हत्या झाली. दोन्ही हत्या या सुऱ्याने गळा चिरून करण्यात आल्या. दोन्ही घटनांमध्ये ज्यांचा मृत्यू झाल्या त्या व्यक्तींनी नुपुर शर्मा यांना पाठिंबा दर्शविणारा वा त्यांचे समर्थन करणारा अशा स्वरुपाचा संदेश सोशल मीडियात फॉरवर्ड वा शेअर केला होता. 

नुपूर शर्मा प्रकरणात काही जणांनी ठरवून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात कारवाई सुरू असतानाच राजस्थान आणि महाराष्ट्रात हत्येच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही प्रकरणात काही जणांना अटक झाली आहे. राजस्थानमध्ये दोन्ही मारेकऱ्यांना पकडण्यात आले आहे. महाराष्ट्रात सहा जणांना अटक झाली आहे. पण घटनांमधील साधर्म्य आणि राजस्थानमधील मारेकऱ्यांचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाल्यामुळे एनआयएने तपास सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने फार्मासिस्ट उमेश कोल्हे आणि टेलर कन्हैय्यालाल या दोघांच्या हत्येचा तपास एनआयएकडे दिला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी