सांगलीतील ४० गावांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा प्रकरण नेमके काय ?

गावगाडा
Updated Nov 24, 2022 | 17:40 IST

maharashtra karnataka border : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या एका वक्तव्याने कर्नाटक सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतं आहे. 

थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता
  • सांगलीतील ४० गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करणार
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे धक्कादायक विधान

मुंबई : सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील 40 गावांना पाणी देण्यास महाराष्ट्र सरकार असमर्थ असल्याने त्या गावांचा कर्नाटकात सामावेश व्हावा, असे वक्तव्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केल्याने महाराष्ट्र विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतं आहे. (What exactly is the issue of the warning of 40 villages in Sangli to go to Karnataka?)

बेळगावसह कर्नाटकमधील मराठी भाषिक गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्यासाठी सीमाभागात अनेक वर्षांपासून लढा सुरू हा. हा प्रश्न न्यायालयात असतानाच मागच्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असल्याचे सांगितले. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील ४० गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करणार असल्याचे धक्कादायक विधान केलं. त्यांच्या या विधानानं महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. 

जाणून घ्या प्रकरण काय ? 

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कायम दुष्काळी परिस्थिती असते. २०१२ मध्ये संतप्त गावकऱ्यांनी कृष्णा खोऱ्यातील म्हैसाळ जलसिंचन योजनेतून पाणी न पुरवल्यास आम्ही कर्नाटकात जाऊ असा इशारा तत्कालीन आघाडी सरकारला दिला होता. तेव्हाचे जतचे भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांनीही सरकार ४० गावांना पाणीपुरवठा करणार नसेल तर ही गावे कर्नाटकात सहभागी होतील, असा इशारा दिला होता. आता हे प्रकरण पुन्हा नव्याने पेटल्याने सीमावादाचीही पुन्हा नव्याने चर्चा होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी