ट्रेंडिंग:

11th FYJC admission: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक

11th Centralise Online admission process 2023-24: दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर आता अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होत आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. जाणून घ्या त्या संदर्भात अधिक माहिती....

Updated Jun 4, 2023 | 02:29 PM IST

11th FYJC admission: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक
FYJC 11th Online Admission: इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यानंतर आता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, 8 जून 2023 पासून अल्पाय करु शकतात. 2023-24 मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार स्थानिक / कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरुन करण्यात येतील.
11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असलेल्या शहरी क्षेत्रांतील प्रवेश फेऱ्यांची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी https://11thadmission.org.in हे पोर्टल असेल. या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावयाचे शहर निवडावे आणि प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही करावी.

कोटांतर्गत प्रवेशाचे वेळापत्रक (Quota Admission Schedule)

8 जून 2023, सकाळी 10 वाजल्यापासून दिनांक 12 जून 2023 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत
 • कोटाअंतर्गत प्रवेश घ्यावयाचा असेल तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंती नोंदविणेची सुविधा (Apply for Quota) विद्यार्थी लॉग इनमध्ये देण्यात आलेली आहे.
13 जून 2023
 • कोटा पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांची कोटवार गुणवत्ता यादी तयार होईल
 • प्रवेशासाठी पात्र आणि प्रतिक्षेतील विद्यार्थ्यांची यादी विद्यालय स्तरावर प्रदर्शित करणे
 • निवडलेल्या विद्यार्थ्यांना कोटाअंतर्गत प्रवेशासाठी फोन करणे (विद्यालय स्तरावरील कार्यवाही)
13 जून 2023 ते 15 जून 2023, सायंकाळी 6 वाजेपर्यंत
 • विद्यालयांना या कालावधीत (व्यवस्थापन, इनहाऊस आणि अल्पसंख्यांक) कोटाअंतर्गत प्रवेश निश्चित करता येतील.
 • कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीनुसार संबंधित विद्यालयात आपला प्रवेश निश्चित करणे
 • विद्यालयांना व्यवस्थापन कोटा व इन-हाऊस कोटा यामधील रिक्त जागा CAP कडे प्रत्यार्पित करता येतील.
16 जून 2023 ते 18 जून 2023
 • कोटानिहाय रिक्त जागा विद्यालय स्तरावर जाहीर केल्या जातील.
 • कोटाअंतर्गत प्रवेश घ्यावयाचा असलेले विद्यार्थी आपली पसंती नोंदवतील
 • कोटा प्रवेशासाठी यापूर्वी नोंदवलेली पसंती विद्यार्थ्यांना बदलता येईल
19 जून 2023 (फेरी 1)
 • कोटा पसंती दिलेल्या विद्यार्थ्यांची कोटावार गुणवत्ता यादी तयार करतील
 • प्रवेशासाठी पात्र / निवडलेले आणि प्रतिक्षेतील विद्यार्थ्यांची यादी विद्यालय स्तरावर प्रदर्शित करणे.
 • निवडलेल्या विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी फोन करणे (विद्यालय स्तरावरील कार्यवाही)
19 जून 2023 सकाळी 10 वाजल्यापासून ते 22 जून 2023 सायंकाळी 6 पर्यंत
 • या कालावधीत कोटांतर्गत प्रवेश निश्चित केले जातील.
 • कोणत्याही कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरल्यास आपला प्रवेश निश्चित करणे. ज्या विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी Apply केलेले आहे व ते प्रवेश घेऊ इच्छितात ते विद्यार्थी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाशी संर्क साधून आपला कोटाअंतर्गत प्रवेश निश्चित करु शकतात.
 • संबंधित विद्यालयाला समक्ष भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करता येईल. (वेळापत्रकानुसार)
22 जून 2023 रात्री 8 पर्यंत
 • प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाईन नोंदवण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी वेळ (रात्री 8 पर्यंत)
 • उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी कोट्यातील रिक्त जागा CAP कडे समर्पित करण्याची वेळ
23 जून 2023
 • कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर कोटानिहाय रिक्त जागा जाहीर करणे.
ताज्या बातम्या

Vivo Price Drop: महिन्याभरात दुसऱ्यांदा स्वस्त झाले Vivo चे हे 2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo Price Drop   Vivo  2

Rahu Ketu Gochar 2023: दिवाळीपूर्वी राहू-केतूचे मोठे संक्रमण, या 5 राशी होणार मालमाल

Rahu Ketu Gochar 2023 -  5

IIT Bombay: मुंबई IIT मध्ये शाकाहार-मांसाहारावरून पुन्हा वाद! मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

IIT Bombay IIT -   10

Nanded Government Hospital Deaths: नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान! आणखी 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाण यांचं ट्वीट

Nanded Government Hospital Deaths   7  4

Asian Games 2023: यशस्वी जैस्वालने इतिहास रचला! आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय

Asian Games 2023

इक्सिगोची 'इक्सिगो अशुअर्ड' सेवा, निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जवर मिळणार Complete Refund Facility

     Complete Refund Facility

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024

Nanded News: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेमकं काय घडलं? रुग्णालय प्रशासनानं सांगितलं कारण

Nanded News
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited