Gautami Patil हिने आडनाव बदलावं काय? काय म्हणाले गावातील लोक आणि नातेवाईक

विशाल ठाकूर, (प्रतिनिधी)Gautami Patil News: 'सबसे कातील गौतमी पाटील', असा आवाज देत संपूर्ण महाराष्ट्राला तिच्या नृत्याने व अदांनी वेड लावणारी व जागोजागी प्रत्येक कार्यक्रम हीट करणारी गौतमी पाटील (Gautami Patil Video)आता तिचा डान्स नव्हे तर तिच्या आडनावावरून चर्चेत आहे. गौतमीच्या 'पाटील' या आडनावावरून नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

Updated May 29, 2023 | 06:59 PM IST

Gautami patil news, Gautami patil Surname, Shindkheda news, Maharashtra news, Latest Marathi news

Gautami patil news, Gautami patil Surname, Shindkheda news, Maharashtra news, Latest Marathi news

विशाल ठाकूर, (प्रतिनिधी)
Gautami Patil News: 'सबसे कातील गौतमी पाटील', असा आवाज देत संपूर्ण महाराष्ट्राला तिच्या नृत्याने व अदांनी वेड लावणारी व जागोजागी प्रत्येक कार्यक्रम हीट करणारी गौतमी पाटील (Gautami Patil Video) आता तिचा डान्स नव्हे तर तिच्या आडनावावरून (Gautami Patil Surname) चर्चेत आहे. गौतमीच्या 'पाटील' या आडनावावरून नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होत असल्यामुळे तिने पाटील आडनाव वापरू नये, अशी मागणी एका संघटनेकडून करण्यात आली. तर ‘मी पाटीलच आहे आणि हेच नाव मी वापरणार’,असे चोख प्रत्युत्तर गौतमी पाटीलने दिले होते.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या गावात गौतमी पाटील लहानाची मोठी झाली आहे. याच गावात तिचं बालपण गेलं. शिक्षण झालं. इथूनच नृत्यांगना म्हणून तिच्या करिअरची सुरुवात झाली. या गावात सध्या गौतमीचे मामा राहतात. पण तेही सध्या पुण्याला स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावण्यात आलेले आहेत. गौतमीच्या गावातील लोकांनी तिच्या आडनाववरून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर काहींना कौतुक वाटतं. ते गौतमीच्या कलेची कदर करत तिला दादही देत आहेत. पाटील आडनाव लावण्याबाबत अनेकांचे सडतोड उत्तर आहे.

गौतमीचं वाढलं बळ

कला आणि जात ही स्वतंत्र आहे. जातीशी कलेला जोडू नये, असे गौतमीच्या गावातील नागरिकांचं मत आहे. एकप्रकारे गौतमीच्या गावातील लोकांनी तिला समर्थनंच दिलं आहे. त्यामुळे गौतमीचं बळ वाढलं आहे.

तेव्हा कुठे होता समाज?

गौतमी पाटीलच्या आईची प्रकृती खालावली होती, तेव्हा समाज कुठे गेला होता? असा थेट सवाल शिंदखेडा येथील गावकऱ्यांनी केला आहे. आज गौतमी पाटीलचे नाव झालं आहे. ती प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे तिला समाजाकडूनच विरोध का होत आहे, असा प्रश्न आता गौतमीच्या गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
गौतमी पाटीलचा जन्म पाटील घरातच झाला असून ते पाटीलच नाव पुढे लावतील असं ही प्रसार माध्यमांशी बोलताना शिंदखेडा येथील नातलगांनी सांगितल आहे एक प्रकारे गौतमी पाटील हिला आपल्या गावाच्या लोकांकडून चांगलाच पाठिंबा मिळत आहे.

'अश्लील डान्स आमच्या समाजावर कलंक'

दुसरीकडे, गौतमी पाटील हिला महाराष्ट्रात प्रसिद्धी हवी असेल तर तिने पाटील हे आडनाव वापरू नये, कारण तिच्या नृत्यामध्ये अश्लील चाळे केले जातात, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे ते नृत्य आमच्या समाजात कलंक आहे, अशा तिव्र प्रतिक्रिया शिंदखेडा येथील नागरिकांच्या एका गटाने दिली आहे.

काय म्हणाले गौतमीचे आजोबा?
गौतमी पाटीलच्या कलेला जातीवरून विरोध करू नका, असे मत तिचे आजोबा प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. गौतमी पाटील ही मुळात पाटीलच घरात समाजात जन्माला आली आहे. तिच्या नावापुढे चाबुकस्वार लावा, असे म्हणणे चुकीचे आहे. गौतमी ही 'पाटील' हेच नाव नावापुढे लावेल, त्यामुळे तिच्या कलेला कोणी विरोध करू नका, अशी प्रतिक्रिया शिंदखेडा येथील रहिवासी आणि गौतमी पाटीलचे चुलत आजोबा प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

'गौतमीच्या हलाखीच्या परिस्थितीत समाज कुठे गेला होता'

गौतमी पाटील ही 96 कुळी मराठा आहेत. ती पाटील घरातच जन्मली आहे. गौतमी पाटील यांची हलाखीची परिस्थिती असताना व त्यांची आईची प्रकृती खालावली असताना तेव्हा समाज कुठे गेला होता, असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अरुण देसले यांनी उपस्थित केला आहे. गौतमी ही कलेच्या माध्यमातून पुढे जात आहे तर त्यांना केवळ पाटील नावारून विरोध केला जात आहे. प्रत्येकांची कला ही वेगवेगळी आहे. कला सादरीकरण करणं हे प्रत्येकाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पाटील नावावरून गौतमीला विरोध करणे हे चुकीच आहे, असेही अरुण देसले यांनी यावेळी सांगितले.
ताज्या बातम्या
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited