Maharashtra HSC Results 2023 OUT, Direct Link at 2PM: 12 वीचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहाल Results

Maharashtra HSC Results 2023 OUT: Direct Link at 2PM: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या HSC अर्थात बारावीच्या परीक्षाचा निकाल आज (25 मे) जाहीर झाला. राज्यातून एकूण 91.25 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विद्यार्थी आपला निकाल दुपारी 2 वाजेनंतर शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर पाहू शकतात.

Updated May 25, 2023 | 01:42 PM IST

Maharashtra HSC Results 2023 OUT, Direct Link at 2PM: 12 वीचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहाल Results
Maharashtra HSC Results 2023 OUT: Direct Link at 2PM: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) अखेर बारावीचा अर्थात HSC परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी आपला निकाल दुपारी 2 वाजेनंतर बोर्डाच्या वेबसाईटवर पाहू शकतात.
यंदा 13 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक निकालाच्या प्रतिक्षेत होते. अखेर आज विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली. राज्याभरातून एकूण 91.25 टक्के विद्यार्थी 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही कोकण विभागाने अव्वल राहाण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लाहला आहे. विद्यार्थी आपला निकाल शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in, mahahsscboard.maharashtra.gov.in, hscresult.mkcl.org, msbshse.co.in, maharashtraeducation.comवर पाहू शकतात.

विभागनिहाय 12 वीच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
कोकण 96.01 %
पुणे - 93.34 %
कोल्हापूर- 93.28 %
छत्रपती संभाजीनगर 91.85 %
अमरावती 92.75 %
नाशिक 91.66 %
लातूर 90.37 %
नागपूर 90.35 %
मुबंई 88.13 %

Maharashtra HSC Result: 12 वीच्या निकालाची विषयानुसार टक्केवारी
विज्ञान (Science)- 96.09%
कला (Arts)- 84.05%
वाणिज्य (Commerce)-90.42%
बारावीच्या निकाल जाहीर झाला आहे. परंतु यंदा निकाल 2.97 टक्क्यांनी घसरल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. राज्याचा बारावीचा एकूण निकाल 91.25 टक्के लागला आहे. बारावीत यंदाही मुलींची बाजी मारली आहे. बारावीत सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी महत्त्वाची माहिती घेवून आलो आहे. ती म्हणजे, विद्यार्थ्यांनी आपला निकाल (Result) कुठे आणि कसा बघायचा? मार्कशीट कशी डाऊनलोड करायची?

या वेबसाईट्सवर निकाल उपलब्ध..

www.hscresult.mkcl.org

ऑनलाईन निकाल कसा पाहाल? (HOW TO CHECK ONLINE 12 RESULTS)
महाराष्ट्र शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला आहे. निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला व्हिजिट करा. होम पेजवर जा आणि महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 / महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा. तुमचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

कसा चेक कराल आपला निकाल? (How to check Maharashtra hsc results 2023 marksheets)

स्टेप 1 - महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा.
स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.
स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.
स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

SMS द्वारे निकाल कसा पाहाल..? (HOW TO CHECK VIA SMS)

स्टेप 1. तुमचा मोबाईल आधी अनलॉक करा आणि SMS अॅपवर जा.
स्टेप 2. तुमचा रोल नंबर त्यानंतर MH (परीक्षेचे नाव) टाईप करा.
स्टेप 3. 57766 वर मेसेज सेंड करा.
स्टेप 4. तुमचा निकाल तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होईल.

डिजीलॉकरद्वारे कसा पाहाल निकाल? (HOW TO CHECK VIA DIGILOCKER)

स्टेप 1. DigiLocker अॅप उघडा किंवा digilocker.gov.in वर लॉग इन करा.
स्टेप 2. आवश्यक तपशील सबमिट करून नवीन नोंदणी करा. तुम्ही आधीच नोंदणी केली असल्यास तुमच्या खात्यात लॉग इन करा.
स्टेप 3. 'MSBSHSE SSC निकाल 2023' वर क्लिक करा.
स्टेप 4. महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल मिळविण्यासाठी तुमच्या आधार कार्डवरील डिटेल्स द्या.
स्टेप 5. निकाल तुम्हाला प्राप्त होईल.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited