Maha Board SSC Result Out: 10 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर; 30 सेकंदात येथे पाहा रिझल्ट

How to check Maharashtra Board SSC Result 2023 Online: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या SSC (10th) परीक्षाच्या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतिक्षा अखेर संपली. महाराष्ट्र बोर्डाने आज, शुक्रवारी (2 जून) दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला. विद्यार्थी आपला निकाल शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर पाहू शकतात.

Updated Jun 2, 2023 | 01:19 PM IST

Maha Board Results, How to Check online Maharashtra Board result, How to Check Through online Maharashtra Board result online

Maha Board Results, How to Check online Maharashtra Board result, How to Check Through online Maharashtra Board result online

Maha Board SSC Result Out: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या SSC (10th) परीक्षाचा निकाल आज, शुक्रवारी (2 जून) जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. दुपारी एक वाजेपासून निकाल ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थी आपला निकाल शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर पाहू शकतात.
2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. कोकण विभाग यंदाही अव्वल ठरला असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकूण उत्तीर्ण परीक्षार्थींची संख्या 60 टक्क्यांहून जास्त असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी दहावीच्या निकालात 3.11 टक्क्यांची घसरण झाली आहे.

कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींचीच बाजी

निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल 98.11 टक्के लागला. तसेच यंदाही मुलींनीच मारली बाजी मारली आहे. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्यातील 10 हजार शाळांचा 100 टक्के निकाल लागला आहे.

किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले

खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 21,216,20574 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,270 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 74.25 आहे.

राज्याचा निकाल 93.83 टक्के, पाहा विभागनिहाय निकाल

पुणे: 95.64 टक्के
नागपूर: 92.05 टक्के
औरंगाबाद: 93.23 टक्के
मुंबई: 93.66 टक्के
कोल्हापूर: 96.73 टक्के
अमरावती: 93.22 टक्के
नाशिक: 92.22 टक्के
लातूर: 92.67 टक्के
कोकण: 98.11 टक्के
नागपूर विभाग 92.05 टक्के
यंदा राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यामध्ये 8,44,116 विद्यार्थी आणि 7,33,067 विद्यार्थीनी आहेत. एकूण 23,010 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 5033 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता आहे.

या वेबसाईट्सवर निकाल उपलब्ध..
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.mahahhscboard.in

ऑनलाईन निकाल कसा पाहाल? (HOW TO CHECK ONLINE 10th RESULTS)

महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला व्हिजिट करा. होम पेजवर जा आणि महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 / महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा. तुमचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

कसा चेक कराल आपला निकाल? (How to check Maharashtra SSC results 2023 marksheets)

स्टेप 1 - महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा.
स्टेप 2- दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.
स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.
स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

SMS द्वारे निकाल कसा पाहाल..? (HOW TO CHECK VIA SMS)

स्टेप 1. तुमचा मोबाईल आधी अनलॉक करा आणि SMS अॅपवर जा.
स्टेप 2. तुमचा रोल नंबर त्यानंतर 10th Exam टाईप करा.
स्टेप 3. 57766 वर मेसेज सेंड करा.
स्टेप 4. तुमचा निकाल तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होईल.

डिजिलॉकरद्वारे कसा पाहाल निकाल? (HOW TO CHECK VIA DIGILOCKER)

स्टेप 1. Digi Locker अॅप उघडा किंवा digilocker.gov.in वर लॉग इन करा.
स्टेप 2. आवश्यक तपशील सबमिट करून नवीन नोंदणी करा. तुम्ही आधीच नोंदणी केली असल्यास तुमच्या खात्यात लॉग इन करा.
स्टेप 3. 'MSBSHSE SSC निकाल 2023' वर क्लिक करा.
स्टेप 4. महाराष्ट्र बोर्ड SSC निकाल मिळविण्यासाठी तुमच्या आधार कार्डवरील डिटेल्स द्या.
स्टेप 5. निकाल तुम्हाला प्राप्त होईल.
ताज्या बातम्या

IIT Bombay: मुंबई IIT मध्ये शाकाहार-मांसाहारावरून पुन्हा वाद! मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

IIT Bombay  IIT  -      10

Nanded Government Hospital Deaths: नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान! आणखी 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाण यांचं ट्वीट

Nanded Government Hospital Deaths     7   4

Asian Games 2023: यशस्वी जैस्वालने इतिहास रचला! आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय

Asian Games 2023

इक्सिगोची 'इक्सिगो अशुअर्ड' सेवा, निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जवर मिळणार Complete Refund Facility

         Complete Refund Facility

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024

Nanded News: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेमकं काय घडलं? रुग्णालय प्रशासनानं सांगितलं कारण

Nanded News

इझमायट्रिपने स्‍मार्ट वॉईस रेकग्निशन टेक्‍नॉलॉजी केली लाँच, ट्रॅव्‍हल बुकिंग अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाणार

धक्कादायक! बोरिवलीहून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनवर दगडफेक, एसी लोकलच्या फोडल्या काचा

बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited