Maha board HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी, mahresult.nic.in वर पाहा निकाल

HSC Result 2023 announced: बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे.

Updated May 25, 2023 | 02:09 PM IST

Maha board HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी, mahresult.nic.in वर पाहा निकाल
Maharashtra Board HSC Class 12 Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी पास झालेल्या मुलींची संख्या 93.73 टक्के इतकी आहे तर 81 टक्के मुले विद्यार्थी झाले आहेत.

कोकण विभाग अव्वल

राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.

विभागनिहाय 12 वीच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

 1. कोकण - 96.01 %
 2. पुणे - 93.34 %
 3. कोल्हापूर - 93.28 %
 4. छत्रपती संभाजीनगर - 91.85 %
 5. अमरावती - 92.75 %
 6. नाशिक - 91.66 %
 7. लातूर - 90.37 %
 8. नागपूर - 90.35 %
 9. मुबंई - 88.13 %

Maharashtra HSC Result: 12 वीच्या निकालाची विषयानुसार टक्केवारी

 1. विज्ञान (Science)- 96.09%
 2. कला (Arts)- 84.05%
 3. वाणिज्य (Commerce)-90.42%

23 विषयांचा निकाल 100 टक्के

12 वीच्या परीक्षा एकूण 154 विषयांत परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
बारावीच्या परीक्षेला 2023 या वर्षात 6113 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6072 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ज्यातून 5673 दीव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

2022 मध्ये किती टक्के लागला होता निकाल?

गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये एकूण राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला होता. कोकण विभागाने निकालात अव्वल स्थान पटकावलं होतं.

Websites for HSC Result 2023

mahresult.nic.in
बोर्डाने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहेत. मात्र, एकाच वेळी जास्त संख्येने विद्यार्थी साईटवर आपला निकाल पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे साईट क्रॅश होण्याची शक्यता असते. अशावेळी विद्यार्थी एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा आपला निकाल पाहू शकतात.

बारावीचा निकाल SMS वर कसा मिळवायचा? How To Check HSC Result 2023 via SMS on Mobile

 • बारावीचा निकाल एसएमएसवर मिळवण्यासाठी सर्वप्रथम मेसेजमध्ये MHHS टाईप करा.
 • त्यानंतर त्याच्यापुढे आपला रोल नंबर टाईप करा.
 • मग हा एसएमएस 57766 या क्रमांकावर सेंड करा.
 • तुम्ही आपला एसएमएस सेंड केल्यावर काही वेळातच तुम्हाला निकाल पहायला मिळेल.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited