Maha Board SSC Result 2023: दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, 'या' वेबसाईटवर पाहा आपला Result
SSC Class 10th Result 2023: दहावीचा निकाल कधी लागणार याची सर्व विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता लागलेली आहे. दहावीचा निकाल बोर्डाकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी पाहू शकतील.
Updated Jun 2, 2023 | 09:47 AM IST

Maharashtra Board SSC Result 2023 date: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ( mahahsscboard.in ) बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता दहावीचा निकाल (SSC Result 2023) कधी जाहीर होणार याची उत्सुकता सर्वांना आहे. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार या संदर्भात सोशल मीडियात अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. मात्र, शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये.
Live Updates on Maharashtra, Board SSC Result 2023
दहावीच्या निकालाची तारीख शिक्षण मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले होते की, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या आठवड्याभरात दहावीच्या निकालाची तारीख जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
या वेबसाइटवर पाहता येणार निकाल (Websites to check Maharashtra Board SSC Result 2023)
mahresult.nic.in mahresult.nic.in यावर बारावीच्या परीक्षेचा निकाल कसा पहाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC), दहावी (SSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in जाहीर करतं. पाहा आपण आपला निकाल कसा पाहू शकता.
- MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा
- Maharashtra SSC result 2023 लिंक आपल्याला होम पेजवर दिसेल. त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर रिझल्ट पेज ओपन होईल
- या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचं नाव टाकायचं आहे.
- ही माहिती भरुन सबमिट बटणावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला आपल्या स्क्रिनवर निकाल पाहता येईल.
यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेला एकूण 15,77,256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली. त्यामध्ये 8,44,116 विद्यार्थी आणि 7,33,067 विद्यार्थीनी आहेत. एकूण 23,010 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 5033 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
ताज्या बातम्या
Ajay Devgn Injured:'सिंघम अगेन'साठी स्टंट करणे अजय देवगणला पडले भारी
T20 World Cup: या कारणामुळे विराट कोहलीला वर्ल्डकपमध्ये संधी मिळणार नाही
Air Force Aircraft Crash: तेलंगणात भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं, दोन वैमानिकांचा मृत्यू
Wedding Decoration in budget: लग्नाच्या सजावटीचा खर्च वाचवण्यासाठी सोप्या टिप्स
108MP ट्रिपल कॅमेरा, 6000mAh बॅटरी आणि जबरदस्त फीचर्ससह Honor X7b स्मार्टफोन लॉन्च
Quitting Job: या चुकीच्या कारणांमुळे नोकरी सोडण्याचा निर्णय कधीही घेऊ नका
Winter Session Of Parliament: पराभवाची निराशा सभागृहात काढू नका, पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला
Pradosh Vrat December 2023: या महिन्यात कधी आहे प्रदोष व्रत? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व
ट्रेंडिंग:
© 2023 Bennett, Coleman & Company Limited