Sharad Pawar News Today : शरद पवारांना धमकी देणारा तरुण भाजपचा कार्यकर्ता? जाणून घ्या सौरभ पिंपळकर आहे तरी कोण?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे.

Updated Jun 9, 2023 | 02:30 PM IST

Sharad Pawar News Today : शरद पवारांना धमकी देणारा तरुण भाजपचा कार्यकर्ता? जाणून घ्या सौरभ पिंपळकर आहे तरी कोण?
NCP Chief Sharad Pawar get death threat: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. शरद पवार यांना ज्या ट्विटर हँडलवरुन धमकी देण्यात आली आहे ते ट्विटर हँडलवर सौरभ पिंपळकर असे नाव आहे.

कोण आहे सौरभ पिंपळकर? Who is Saurabh Pimalkar

शरद पवार यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या ट्विटर हँडलवर युजरचे नाव सौरभ पिंपळकर असे आहे. इतकेच नाही तर त्याच्या ट्विटर बायोमध्ये तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच तो अमरावतीचा निवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सौरभ पिंपळकर हा खरंच भाजपचा कार्यकर्ता आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धमकी मागचा मास्टरमाईंड शोधा - अजित पवार

या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, "आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार...’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं. धमकीमागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल".
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोशल मीडियावर देण्यात आलेल्या धमकीवर प्रतिक्रिया देताना अजित पवार पुढे म्हणाले की, आदरणीय पवार साहेबांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रतील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही.
ताज्या बातम्या

Vivo Price Drop: महिन्याभरात दुसऱ्यांदा स्वस्त झाले Vivo चे हे 2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo Price Drop   Vivo  2

Rahu Ketu Gochar 2023: दिवाळीपूर्वी राहू-केतूचे मोठे संक्रमण, या 5 राशी होणार मालमाल

Rahu Ketu Gochar 2023 -  5

IIT Bombay: मुंबई IIT मध्ये शाकाहार-मांसाहारावरून पुन्हा वाद! मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

IIT Bombay IIT -   10

Nanded Government Hospital Deaths: नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान! आणखी 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाण यांचं ट्वीट

Nanded Government Hospital Deaths   7  4

Asian Games 2023: यशस्वी जैस्वालने इतिहास रचला! आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय

Asian Games 2023

इक्सिगोची 'इक्सिगो अशुअर्ड' सेवा, निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जवर मिळणार Complete Refund Facility

     Complete Refund Facility

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024

Nanded News: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेमकं काय घडलं? रुग्णालय प्रशासनानं सांगितलं कारण

Nanded News
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited