Shivsena Crisis: आमदारांच्या अपात्रतेच्या निकालासाठी वेळमर्यादा निश्चित करा; कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले

Maharashtra Political Crisis: विधानसभा अध्यक्षांकडून या प्रकरणी निर्णय घेण्यास विलंब होत असून लवकरात लवकर निर्णय़ घेण्याचे निर्देश देण्यात यावा यासाठी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर आज सर्वोच्च सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या दरम्यान कोर्टाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले निकालासाठी वेळ मर्यादा ठरवण्याचे निर्देश दिले आहेत.

Updated Sep 18, 2023 | 07:32 PM IST

Shivsena Crisis

Shivsena Crisis: fix time limits for decision of disqualification of MLAs; Supreme court to Assembly Speaker

Shivsena Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायाल्याने विधानसभा अधक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित याचिकांवर पुढील आठवड्यापर्यंत सुनावणी घ्यावी तसेच हे प्रकरण निकाली काढण्यासाठी वेळ मर्यादा देखील निश्चित करावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली होती. हे सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने काही महत्त्वाची निरिक्षणं नोंदवत हा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवली आहे. तसेच योग्य वेळेत हा निर्णय घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 16 आमदारांवरील अपात्रतेचा खटला प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून, त्यावर सभापतींनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
विधानसभा अध्यक्षांकडून या प्रकरणी निर्णय घेण्यास विलंब होत असून लवकरात लवकर निर्णय़ घेण्याचे निर्देश देण्यात यावा यासाठी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर आज सर्वोच्च सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या दरम्यान कोर्टाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले निकालासाठी वेळ मर्यादा ठरवण्याचे निर्देश दिले आहेत.

खटला निकाली काढण्याची कालमर्यादा - सुप्रीम कोर्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित याचिकांवर पुढील आठवड्यापर्यंत सुनावणी करावी, तसेच या काळात खटला निकाली काढण्याची कालमर्यादाही ठरवावी असे निर्देश कोर्टाने अध्यक्षांना दिले आहेत. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास होत असलेल्या दिरंगाईवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर निकाल देताना जारी केलेल्या निर्देशांचा देखील आदर केला जाईल अशी अपेक्षा आहे, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने नार्वेकर यांना फटकारले आहे.

तुम्ही अनिश्चित काळासाठी बसून राहू शकत नाही - सुप्रीम कोर्ट

विधानसभा अध्यक्षांना फटकारताना सुप्रीम कोर्ट म्हणाले की तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी तुम्ही अनिश्चित काळासाठी बसून राहू शकत नाही. संविधानाच्या 10 व्या अनुसूचीनुसार, सभापती कोणत्याही निर्णयाला अनिश्चित काळासाठी विलंब करू शकत नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना म्हणाले.
ताज्या बातम्या

Desi Jugaad : देशी जुगाड करून मुलाने बनवली 8 सीटर बाईक, व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क!

Desi Jugaad    8

Vivo X90 Pro: Vivo चा हा स्मार्टफोन iPhone ला देणार मजबूत टक्कर!

Vivo X90 Pro Vivo  iPhone

Sky Force Teaser: अक्षय कुमारने गांधी जयंतीला केली आगामी चित्रपटाची घोषणा, या दिवशी रिलीज होणार 'स्काय फोर्स'

Sky Force Teaser

Virushka second baby news: अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीची चर्चा, तर विराटचे मुंबईत तात्काळ लॅंडींग

Virushka second baby news

Ghee Side Effects : या लोकांनी चुकूनही खाऊ नये देशी तूप , फायद्याऐवजी होईल नुकसानच

Ghee Side Effects

Beed Crime: बीड शहरात गोळीबार, एक गंभीर जखमी!

Beed Crime

सणासुदीच्या काळात ग्राहकांची दीवाळी! SBI च्या 3 मोठ्या घोषणा! , जाणून घ्या काय आहेत OFFERS?

  SBI 3    OFFERS

Panchami Shraddha 2023: अविवाहित पितरांचे या तिथीला करा श्राद्ध, पितृदोषापासून मुक्ती मिळेल

Panchami Shraddha 2023
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited