मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! शनिवार-रविवारी नळाला येणार नाही पाणी

Water Cut in Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई शहराच्या मुख्य भागात शनिवार- रविवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. पाणी पुरवठा विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. विकेंड आणि त्यात पाणीपुरवठा बंद राहाणार असल्यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

Updated May 26, 2023 | 01:46 PM IST

Water Cut in Mumbai, Mumbai, Mumbai news, Maharashtra news, BMC

Water Cut in Mumbai, Mumbai, Mumbai news, Maharashtra news, BMC

Water Cut in Mumbai:उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शहराच्या मुख्य भागात शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, शुक्रवारी पाणी साठवून ठेवा, असं आवाहन मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
बृहृमुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, शनिवार 27 मे, ते रविवार 28 मे 2023 या दिवासांमध्ये पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मध्य मुंबईत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनी कुठे लीक आहे का, हे शोधण्यासाठी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जिथं प्राथमिक स्वरुपात पाणीकपात लागू करत गळती दुरुस्ती करण्यात येणार आहे.

कोणत्या भागात बंद राहिल पाणी पुरवठा?

मध्य मुंबईतील दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, परळ या भागांमध्ये शनिवार आणि रविवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच
गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभागात, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, कापड बाजार या भागात शनिवारी संध्याकाळी 4 ते रात्री 10 या कालावधीत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर धोबी घाट, सातरस्ता, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, या परिसरात दिनांक 28 मे रविवारी पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे, असे महापालिकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पाणी पुरवठा बंद असल्यामुळे प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार या परिसराला मोठा फटका बसणार आहे.
दरम्यान, सध्या शाळांना उन्हाळी सुट्या आहे. सर्व विद्यार्थी घरी आहेत. अशात शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवसांत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने गृहिनींची मोठी डोकेदुखी होणार आहे. मुंबईकरांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited