Chandra Grahan 2021: या वर्षाच्या शेवटच्या चंद्रग्रहण काळात सहा तास काय घेणार खबरदारी

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 11, 2021 | 08:03 IST

Chandra Grahan 2021:भारतीय वेळेनुसार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी चंद्रग्रहण लागणार आहे. तर सायंकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी ग्रहण सुटणार आहे.

Chandra Grahan 2021
चंद्रग्रहण काळात घ्या विशेष काळजी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • या वर्षातील पहिले चंद्रग्रहण २६ मे रोजी झाले होते आणि दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबर रोजी होणार.
 • 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी चंद्रग्रहण लागणार.
 • चंद्रग्रहण हे छायाग्रहण असेल, त्यामुळे ग्रहणात सुतक कालावधी नसेल.

Chandra Grahan 2021: नवी दिल्ली : भारतीय वेळेनुसार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी चंद्रग्रहण लागणार आहे. तर सायंकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी ग्रहण सुटणार आहे. हे ग्रहण कार्तिक शुक्ल पक्षाच्या पूर्णिमा तिथीवर वृष राशी, कृतिका नक्षत्रात लागणार आहे. कृतिका नक्षत सूर्य देवाचे नक्षत्र आहे आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. यामुळे या ग्रहणाचा प्रभाव चंद्रमा, सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित लोकांवर विशेष पडणार आहे. चंद्र ग्रहण हे छायाग्रहण असेल, त्यामुळे ग्रहणात सुतक कालावधी वैध राहणार नाही, तरीही अनेक राशींवरही त्याचा परिणाम होईल.

ईशान्येकडील राज्यांमध्ये काही क्षणांसाठी ग्रहण दिसणार 

संपूर्ण भारतात हे चंद्रग्रहण दिसणार आहे, परंतु ईशान्येकडील आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये चंद्रग्रहण काही क्षणांसाठीच दिसू शकते. तथापि, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया आणि उत्तर युरोपमध्ये संपूर्ण ग्रहण दिसेल. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण २६ मे रोजी झाले होते आणि दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र वृषभ राशीतून आठव्या भावात जाईल.  नवव्या घरात शनिदेव आणि देव गुरु बृहस्पति यांचा संयोग होईल. सहाव्या घरात मंगळ किंवा बुधाशी योग बनतील. ग्रहण काळात वृषभ राशीच्या लोकांना विशेष लक्ष द्यावे लागेल. राहू आधीच वृषभ राशीत भ्रमण करत आहे, हे ग्रहण कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी संमिश्र परिणाम देईल.

चंद्रग्रहण काळात काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

 1. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घरातच थांबावे.
 2. ग्रहणात चंद्राकडे पाहू नका. याचा मुलावर वाईट परिणाम होतो.
 3. चाकू, कात्री, सुया इत्यादी धारदार वस्तू वापरू नका.
 4. ग्रहण काळात काहीही खाऊ नका, शिवणकाम देखील करू नका.
 5. तोंडात तुळशी ठेऊन हनुमान चालिसाचा पाठ करा.
 6. ग्रहण संपल्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान करावे.
 7. असे मानले जाते की ग्रहण काळात चंद्राचे गुरुत्वाकर्षण खूप जास्त असते, त्यामुळे गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये.
 8. ग्रहणाच्या वेळी महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. त्यांना अस्वस्थता, घाम येणे आणि अशक्तपणा येऊ शकतो.
 9. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी आपल्यासोबत नारळ ठेवावा. यामुळे ग्रहणाचा कोणताही वाईट परिणाम होत नाही.
 10. ग्रहण काळात जप, ध्यान करत राहा. इष्ट देवाच्या मंत्रांचा जप मनातच करावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी