Ashtavinayak Temples: ही आहेत श्री गणेशाची 8 जागृत देवस्थानं, आयुष्यात एकदा नक्की भेट द्या

Ganesh Chaturthi 2023 Special: देशभरात गणपतीची अनेक मंदिरं आहेत. परंतु महाराष्ट्रातील अष्टविनायकाला विषेश महत्त्व आहे. राज्यात गणपतीचे आठ जागृत देवस्थान आहे. या देवस्थानांना अष्टविनायक असे म्हटले जाते. जेवढे महत्त्व देवीच्या 108 शक्तीपीठांना आणि महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांचे आहे. तेवढेच महत्त्व अष्टविनायकाचे आहे.

Updated Sep 19, 2023 | 08:02 AM IST

Ashtavinayak Temples

Ashtavinayak Temples: These are 8 shrines of Lord Ganesha, must visit once in a lifetime

Ashtavinayak Temples In Maharashtra: यंदा गणेशोत्सवाला मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. गणपतीला 64 कलांचा धनी आणि बुद्धीची देवता म्हटले जाते. गणपतीच्या कृपेनं प्रत्येक शुभकार्य निर्विघ्नपणे पूर्ण होते अशी मान्यता आहे. ज्या घरात गणपती विराजमान असतात त्या घरात कोणतेही विघ्न येत नाही अशी देखील मान्यता आहे. आजपासून सर्वांच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे.
देशभरात गणपतीची अनेक मंदिरं आहेत. परंतु महाराष्ट्रातील अष्टविनायकाला विषेश महत्त्व आहे. राज्यात गणपतीचे आठ जागृत देवस्थान आहे. या देवस्थानांना अष्टविनायक असे म्हटले जाते. जेवढे महत्त्व देवीच्या 108 शक्तीपीठांना आणि महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांचे आहे. तेवढेच महत्त्व अष्टविनायकाचे आहे. जाणून घ्या कुठे आहेत अष्टविनायक, महत्त्व आणि मान्यता याविषयी.

मोरेश्वर गणपती, मोरगाव (Moreshwar, Morgaon)

मोरगावचा मोरेश्रर हा अष्टविनायकांपैकी पहिला गणपती आहे. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीला श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी (Moraya Gosavi) यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. पुणे जिल्ह्यात बारामतीपासून 38 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

श्री चिंतामणी गणपती, थेऊर (Chintamani, Theur)

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती. गणेश भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा अशी चिंतामणीची ओळख आहे. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. त्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. थेऊर हे ठिकाण पुणे-सोलापूर महामार्गालगत असून पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे.

श्री सिद्धिविनायक, सिद्धटेक (Siddhivinayak, Siddhatek)

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती आहे. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक आहे. सिद्धटेक हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून हे मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर आणि त्याच्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून 19 किलोमीटर अंतरावर आहे.

महागणपती, रांजणगाव (Mahaganpati, Ranjangaon)

महागणपती अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती आहे. त्रिपुरासुर या दैत्याला महादेवाने प्रदान केलेल्या शक्ंतीचा तो दुरूपयोग करु लागला आणि त्याने स्वर्गलोक व पृथ्वीलोकातील लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर महादेवाला श्री गणेशाला आवाहन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला, अशी महागपतीची दंतकथा आहे. त्यामुळे या गणपतीला ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असेही म्हटले जाते. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. रांजणगाव हे श्री क्षेत्र पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.

विघ्नेश्र्वर, ओझर (Vighneshwar, Ozar)

ओझरच्या विघ्नेश्र्वर हा अष्टविनायकांपैकी पाचवा गणपती आहे. येथील श्री गणेशाची मूर्ती लांब, रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखलं जातं. येथील गणेशाच्या डोळ्यात माणिक मोती आणि कपाळावर हिरा आहे. अतिशय प्रसन्न आणि मंगलमूर्ती रुप असलेला विघ्नेश्वर भक्तांच्या विघ्नांचे हरण करतो अशी मान्यता आहे. जुन्नर तालुक्यातील लेण्याद्रीपासून 14 किलोमीटर तर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.

श्री गिरिजात्मज, लेण्याद्री (Girijatmaj, Lenyadri)

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा अष्टविनायकापैकी सहावा गणपती आहे. शिवनेरी किल्ल्याच्या सान्निध्या आणि प्राचीन लेण्यांच्या समुदायात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. येथील श्री गणेशाची अतिशय प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हे देवस्थान जुन्नरपासून 7 किलोमीटर अंतरावर, तर पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटरवर आहे.

वरदविनायक, महड (Varadvinayak, Mahad)

महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे . मंदिराचा कळस सोनेरी आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली-खालापूरच्या दरम्यान आहे.

श्री बल्लाळेश्वर, पाली (Ballaleshwar, Pali)

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. चिरेबंदी मंदिरात येथील गणपतीची मूर्ती विराजमान आहे. मंदिरात मोठी घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली होती. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून पाली- खोपोलीपासून 38 तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे.
ताज्या बातम्या

Weight Gain Superfoods : वजन वाढवण्यासाठी आहारात करा या 5 सुपरफूडचा समावेश

Weight Gain Superfoods       5

रश्मिका मंदान्नाचा Animal मधील फर्स्ट लूक रिलीज, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, साडीत दिसतेयं सुंदर

  Animal

Maharastra Rain Update: राज्यात पावसाचा जोर कायम, नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Maharastra Rain Update

नवरोबाची तक्रार टाळायची असेल तर या मेकअप टिप्स फॉलो करा आणि वेळ वाचवा

फेस स्टीम हा एक आरोग्यदायी ब्युटी ट्रेंड आहे, जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

खांदे आणि कमरेवरचा फॅट कमी करण्यासाठी घरीच करा या व्यायामांचा सराव

महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळ या दिवशी सहा तास राहणार बंद

Parivartini Ekadashi 2023: कधी आहे परिवर्तिनी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

Parivartini Ekadashi 2023
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited