Chanakya Niti: श्रीमंत लोक कधीच करत नाहीत 'या' चुका, म्हणून ते...

Chanakya Niti: प्रत्येक व्यक्तीच्या हातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चुका होत असतात. परंतु, जो व्यक्ती या चुका वेळेत सुधारतो तोच जीवनात यशस्वी होतो. चुका सुधारल्या नाहीत तर व्यक्तीला रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. अशाच काही चुकांबाबत आचार्य चाणक्य यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.

Updated May 26, 2023 | 09:45 AM IST

Chankya, Chanakya Niti, Chanakya Niti in Marathi, Chanakya Niti For Success

Chankya, Chanakya Niti, Chanakya Niti in Marathi, Chanakya Niti For Success

थोडं पण कामाचं
  • चुका सुधारल्या नाहीत तर व्यक्तीला रस्त्यावर यायला वेळ लागत नाही.
  • चार्य चाणक्य यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
  • लोभी आणि अहंकारी व्यक्तीकडे पैसा कधीच टिकत नाही.
Chanakya Niti: प्रत्येक व्यक्तीच्या हातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चुका होत असतात. परंतु, जो व्यक्ती या चुका वेळेत सुधारतो तोच जीवनात यशस्वी होतो. चुका सुधारल्या नाहीत तर व्यक्तीला रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. अशाच काही चुकांबाबत आचार्य चाणक्य यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
आचार्य चाणक्य यांच्या नीति शास्त्रानुसार, व्यक्ती त्याच्या चुकांमुळे देशोधडीला लागू शकतो. रस्त्यावर येऊ शकतो. अशा चुका आपल्या हातून होणार नाहीत, याबाबत प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यायला हवी. श्रीमंत लोक कधीच करत अशा चुका करत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष्मीची कृपादृष्टी कायम असते.

लोभ आणि अहंकार

लोभी आणि अहंकारी व्यक्तीकडे पैसा कधीच टिकत नाही. अशी व्यक्ती गरीब होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. अशा लोकांवर महालक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही.

स्वच्छता

चाणक्य नीतीनुसार, आपण नेहमी स्वतः स्वच्छ राहावे. घरात आणि आजूबाजूची स्वच्छता ठेवावी. अशाच ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास करते. श्रीमंत लोक नेहमी स्वच्छताप्रिय असतात.

फालतू खर्च

तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही पैशाची बचत करायला हवी. तुम्ही नेहमी पैसे शहाणपणाने खर्च करायला हवे. विचार न करता पैसे पाण्यासारखे खर्च केल्याने सर्वात श्रीमंत माणूसही काही दिवसांत गरीब होतो. त्यामुळे तुम्ही श्रीमंत असोत किंवा मध्यमवर्गीय, पैसे वायफळ खर्च करू नका. पैसे दान आणि गरजूंना मदत करण्यासाठी गुंतवणे चांगले होईल, यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरपूर पैसे देईल, असे चाणक्य यांच्या नीतीशास्त्रात सांगितले आहे.

वाईट संगत

वाईट संगतीमुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. सुखी जीवन जगणारा माणूसही उद्ध्वस्त होतो. त्याची संपत्ती, सुख, आरोग्य, नातेसंबंध सर्वच बिघडते. तो चुकीच्या किंवा अनैतिक गोष्टी करू लागतो. घरात लोक अनैतिक वागतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited