ट्रेंडिंग:
Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून चंद्र पाहिला तर काय होईल?
Chandra Dosh: भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दिसणे किंवा पाहणे अशुभ मानले जाते. पौराणिक कथेनुसार गणेशाच्या गाजमुखाला चंद्र हसला होता, त्यामुळे भगवान गणेशाने चंद्राला शाप दिला होता, ज्यामुळे चंद्राने त्याचा चंद्रप्रकाश गमावला होता. असे म्हणतात की या दिवशी चंद्राकडे पाहिल्यास माणसावर खोटा कलंक लागतो. असे असताना जर एखाद्याला चुकून चंद्र दिसला तर काय करावे? जाणून घ्या-
Updated Sep 16, 2023 | 09:06 AM IST

गणेश चतुर्थीला चंद्र दिसला तर काय करावे?
गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही?
पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की, भगवान शंकरांकडून मस्तक कापल्यानंतर, माता पार्वतीच्या आक्रोशाने गणेश यांना गजमुखाचे मस्तक लावून पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यावेळी, प्रत्येक देवदेवता गणेशाला पुन्हा जीवन मिळावे म्हणून आशीर्वाद देत होते. मात्र, तेथे उपस्थित चंद्रदेव हसत उभे होते. जेव्हा गणेशजींना समजले की चंद्रदेव त्यांच्या गाजमुखाला हसत आहेत, तेव्हा संतप्त होऊन त्यांनी चंद्रदेवांना शाप दिला की, 'तू कायमचा काळा होशील'. गणेशाच्या या शापामुळे चंद्रदेव आपले स्वतःचे तेच हरपून बसले. तेव्हा चंद्रदेवांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी श्रीगणेशाकडे क्षमा मागितली. त्यावेळी गणेशाने त्यांना सांगितले की, सूर्याच्या प्रकाशाने एकदा तुम्ही पूर्ण व्हाल, परंतु चतुर्थीचा हा दिवस तुम्हाला शिक्षा करण्यासाठी नेहमी स्मरणात राहील. भगवान गणेशाने दिलेल्या शापानुसार जो कोणी भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे तोंड पहिल त्याच्यावर खोटा आरोप केला जाईल.भगवान श्रीकृष्णाला देखील लागला होता कलंक
असे म्हंटले जाते की, भगवान श्रीकृष्णाने चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेतले होते. याच कारणावरून त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप करण्यात आला होता. म्हणूनच भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला 'कलंक चतुर्थी' असेही म्हंटले जाते. यामुळेच या दिवशी चंद्र पाहण्यास सर्वांना मनाई आहे.चंद्र दिसला तर काय करावे?
गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला चंद्र दिसला तर तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. या मंत्राचा जप केल्याने कलंक लागत नाही असे मानले जाते.गणेश चतुर्थी 2023
यावर्षी गणेश चतुर्थी 18 सप्टेंबर आणि इतर कॅलेंडरनुसार, मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी केली जाईल. नक्की तारीख आणि वेळ काय आहे हे जाणून घेऊ या-गणेश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त
अशात श्री गणेश चतुर्थी उदयोतिथीनुसार 19 सप्टेंबरला साजरी केली जाईल.Air Force Aircraft Crash: तेलंगणात भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं, दोन वैमानिकांचा मृत्यू

Wedding Decoration in budget: लग्नाच्या सजावटीचा खर्च वाचवण्यासाठी सोप्या टिप्स

108MP ट्रिपल कॅमेरा, 6000mAh बॅटरी आणि जबरदस्त फीचर्ससह Honor X7b स्मार्टफोन लॉन्च

Quitting Job: या चुकीच्या कारणांमुळे नोकरी सोडण्याचा निर्णय कधीही घेऊ नका

Winter Session Of Parliament: पराभवाची निराशा सभागृहात काढू नका, पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

Pradosh Vrat December 2023: या महिन्यात कधी आहे प्रदोष व्रत? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व

Maharashtra Weather Update : चक्रीवादळाचा परिणाम! राज्यात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा इशारा

Assembly Election Result: मोदी लाटेची कमाल; 3 राज्यांमध्ये कमळ फुललं, देशातील 12 राज्यांत भाजप सरकार


03:20
BJP Win Vidhansabha Election: 3 राज्यांत भाजपची एकहाती सत्ता, राज्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

02:26
Amol Kolhe: ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली, सिग्नलवर ऑनलाईन दंड; अमोल कोल्हेंनी केली पोलखोल

02:24
Gondia To Tirupati: तब्बल 10 महिन्यांच्या कालावधीनंतर गोंदिया-तिरुपती विमानसेवेला प्रारंभ

02:31
Pune Milk Protest: दूध दरासाठी शेतकरी आक्रमक! रस्त्यावर दूध ओतून तीव्र आंदोलन

01:13
UDAY SAMANT ON AJIT PAWAR: उदय सामंतांचा अजित पवार गटाला चिमटा, मावळमध्ये श्रीरंग बारणेच असतील
© 2023 Bennett, Coleman & Company Limited