Daily Horoscope 1 June: आजचे राशीभविष्य; 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस लाभदायक

Daily Horoscope आजचे राशी भविष्य, 1 जून 2023: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Updated May 31, 2023 | 06:09 PM IST

Daily Horoscope 1 June: आजचे राशीभविष्य; 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस लाभदायक
थोडं पण कामाचं
 • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
 • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
 • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा
Daily Horoscope 1 June Rashi Bhavishya, आजचे राशी भविष्य 1 जून 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. नव्या नोकरीची संधी चालून येईल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि निळा.
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आज तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला हवी तशी नोकरी मिळू शकते. व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. आजचा शुभ रंग - पिवळा.
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. कुटुंबात, मित्र-परिवारात आनंदाचे वातावरण पहायला मिळेल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. गुंतवणूक करण्यावर भर द्याल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वायफळ खर्च टाळा. आजचा शुभ रंग - लाल.
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: अविवाहित असलेल्यांना लग्नाचे प्रस्ताव येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होईल. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आजचा शुभ रंग - हिरवा आणि निळा.
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी सर्व बाबतीत अनुकूल असणार आहे. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याची शक्यता आहे. लवकरच कुटुंबात धार्मिक कार्य पार पडण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. प्रेम-संबंधात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. भविष्यासाठी चांगली गुंतवणूक कराल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आज तुम्हाला व्यापारात चांगला नफा प्राप्त होईल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. व्यापार वाढीसाठी प्रयत्न कराल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - केशरी.
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या कामात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. घरी पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. पाहुण्यांसोबत गप्पा-गोष्टींनी जुन्या आठवणींना उजाळा द्याल. आजचा शुभ रंग - लाल आणि पांढरा.
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आजचा दिवस तुमचा धावपळीचा असेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत खालावल्यामुळे अस्वस्थ व्हाल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पिवळा.
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: जुन्या एखाद्या गोष्टीमुळे कुटुंबात वाद होऊ शकतात. यामुळे कुटुंबातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. सासरवाडीतून लवकरच आनंदाची बातमी येईल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पांढरा आणि निळा.
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: बाहेरील खाद्य-पदार्थ टाळा. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च करणं टाळा. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्याल. आजचा शुभ रंग - हिरवा.
ताज्या बातम्या

IIT Bombay: मुंबई IIT मध्ये शाकाहार-मांसाहारावरून पुन्हा वाद! मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

IIT Bombay IIT -   10

Nanded Government Hospital Deaths: नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान! आणखी 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाण यांचं ट्वीट

Nanded Government Hospital Deaths   7  4

Asian Games 2023: यशस्वी जैस्वालने इतिहास रचला! आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय

Asian Games 2023

इक्सिगोची 'इक्सिगो अशुअर्ड' सेवा, निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जवर मिळणार Complete Refund Facility

     Complete Refund Facility

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024

Nanded News: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेमकं काय घडलं? रुग्णालय प्रशासनानं सांगितलं कारण

Nanded News

इझमायट्रिपने स्‍मार्ट वॉईस रेकग्निशन टेक्‍नॉलॉजी केली लाँच, ट्रॅव्‍हल बुकिंग अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाणार

धक्कादायक! बोरिवलीहून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनवर दगडफेक, एसी लोकलच्या फोडल्या काचा

बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited