Daily Horoscope 21 May: आजचे राशीभविष्य; हा रविवार तुमच्यासाठी कसा? वाचा

Daily Horoscope आजचे राशी भविष्य, 21 मे 2023: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Updated May 20, 2023 | 04:20 PM IST

Daily Horoscope 21 May: आजचे राशीभविष्य; हा रविवार तुमच्यासाठी कसा? वाचा
थोडं पण कामाचं
 • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
 • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
 • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा
Daily Horoscope 21 may Rashi Bhavishya, आजचे राशी भविष्य 21 मे 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today : आरोग्याची काळजी घ्या. घरातील महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्या. बाहेर फिरायला जाऊ शकता. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना खूप विचार करा. आजचा शुभ रंग - लाल.
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today : आपल्या मित्रपरिवारांसोबत दिवस खूप उत्तम जाईल. त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया तुमच्यासाठी आनंददायक ठरतील. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवाल. धन लाभ होईल. दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. शुभ रंग - हिरवा.
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today : नोकरीत लवकरच पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. अचानक प्रवासाचे योग संभवतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. दुसऱ्यांच्या मताचा आदर कराल. खर्च वाढेल मात्र पैसाही हातात खेळता राहील. आजचा शुभ रंग - पिवळा.
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today : प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today : कार्यालयीन कामात उत्सफुर्तपणे सहभाग घ्याल. कौटुंबिक जीवनात चांगल्या गोष्टी घडतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today : सुरूवातीला कामात काही अडचणी येतील. पैशांच्या नियमित व्यवहारामुळे चिंता करण्याची गरज नाही. नोकरीत सहकाऱ्यांची चांगली साथ मिळू शकते. मित्रांना भेटून खूप प्रसन्नता वाटेल. कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल. शुभ रंग - निळा.
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today : वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण राहील. वरिष्ठांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. भगवान श्री गणेशाची आराधना करा. आजचा शुभ रंग - निळा.
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today : चिंता करणं थोडं कमी करा. तुम्ही खूप भावुक व्हाल. साहित्य, लेखन आणि कलाक्षेत्रांमध्ये तुमचे कार्य लाभदायक ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली साथ मिळेल. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष्य ठेवणं गरजेचं आहे. शुभ रंग - लाल.
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today : आरोग्य निरोगी राहील. आर्थिक लाभ होईल. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद आणि सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग - नारंगी.
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today : मीडिया क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्न वातावरण कायम राहील. आरोग्य उत्तम राहील. आजचा शुभ रंग - लाल.
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today : इतरांशी व्यवहार करताना किंवा बोलताना लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका. तुमच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. थोडीशी अस्वस्थता जाणवेल. मुख्य म्हणजे आहारावर नियंत्रण ठेवा, त्यासाठी मनशांती हा उत्तम मार्ग आहे. शुभ रंग - पिवळा.
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today : कामा-धंद्यात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. मनात असंतोष निर्माण होईल. वायफळ खर्च करणं टाळा. आजचा शुभ रंग - लाल.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited