ट्रेंडिंग:

Ganesh Chaturthi 2023 Messages: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मराठमोळे शुभेच्छापत्र, Facebook आणि WhatsApp मेसेजेस

Happy Ganesh Chaturthi 2023 Messages: गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाचं आगमन होतं. या दिवसाची गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतात. याच गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे मेसेजेस तुम्ही सोशल मीडियात शेअर करुन आनंद द्विगुणित करा.

Updated Sep 18, 2023 | 06:48 PM IST

Ganesh Chaturthi 2023 Messages: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मराठमोळे शुभेच्छापत्र, Facebook आणि WhatsApp मेसेजेस
Happy Ganesh Chaturthi messages in Marathi: गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत होते आणि तो दिवस म्हणजे गणेश चतुर्थीचा... अखेर हा क्षण आला आहे. यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav) सुरुवात होत आहे. याच गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) निमित्त मित्र, नातेवाईकांना शुभेच्छा देणारे काही खास मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Happy Ganesh Chaturthi 2023 messages quotes wishes status)
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे काही मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. हे मेसेजेस तुम्ही Facebook, Instagram, WhatsApp सह इतर सोशल मीडियात शेअर करु शकता. या मेसेजेच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींसह नातेवाईकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन गणेशोत्सव साजरा करु शकता.

Happy Ganesh Chaturthi messages

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
============================================
सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला
ढगांचा ढोल घुमु लागला
बिजलीचा ताशा जसा कडकड कडाडला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
आला आला आला माझा गणराज आला
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
============================================
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
============================================
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणपती बाप्पा मोरया...
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
============================================
बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात
भरभरून सुख-समृद्धी येवो
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
============================================
श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
============================================
कोणतीही येऊ दे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
आहे आम्हाला सार्थ विश्वास
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
ताज्या बातम्या

Vivo Price Drop: महिन्याभरात दुसऱ्यांदा स्वस्त झाले Vivo चे हे 2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo Price Drop   Vivo  2

Rahu Ketu Gochar 2023: दिवाळीपूर्वी राहू-केतूचे मोठे संक्रमण, या 5 राशी होणार मालमाल

Rahu Ketu Gochar 2023 -  5

IIT Bombay: मुंबई IIT मध्ये शाकाहार-मांसाहारावरून पुन्हा वाद! मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

IIT Bombay IIT -   10

Nanded Government Hospital Deaths: नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान! आणखी 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाण यांचं ट्वीट

Nanded Government Hospital Deaths   7  4

Asian Games 2023: यशस्वी जैस्वालने इतिहास रचला! आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय

Asian Games 2023

इक्सिगोची 'इक्सिगो अशुअर्ड' सेवा, निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जवर मिळणार Complete Refund Facility

     Complete Refund Facility

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024

Nanded News: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेमकं काय घडलं? रुग्णालय प्रशासनानं सांगितलं कारण

Nanded News
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited