June 2023 Grah Gochar: जून मध्ये मंगळ, शनि सोबत 4 महत्वपूर्ण ग्रहांचे संक्रमण, या 5 राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी!

​​June 2023 Grah Gochar: जून महिन्यात प्रमुख ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव देश आणि जगासह मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींवर राहील. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत की प्रमुख ग्रहांच्या राशी बदलाच्‍या वेळी कोणत्‍या राशीच्‍या लोकांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.

Updated May 21, 2023 | 06:30 PM IST

June Grah Gochar 2023

जून महिन्यात या महत्वपूर्ण ग्रहांचे गोचर होणार

June 2023 Grah Gochar: जून महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचे राशीबदल होणार आहे, त्याची सुरुवात ग्रहांचा राजकुमार बुध पासून होत आहेत. बुध ग्रह 7 जून रोजी मेष राशीमधून वृषभ राशित संक्रमण करणार आहे. त्यानंतर 24 जून रोजी वृषभेतून मिथुन राशीमध्ये मार्गक्रम करणार आहे. दुसरीकडे जून महिन्याच्या मध्यान्ह ग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करेल. तसेच काही दिवसांनंतर, मंद गतीने जाणारा शनि 17 जून रोजी कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहे. जून महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 जून रोजी, ग्रहांचा सेनापती मंगळ सिंह राशीत वास्तव्य करणार आहे.
ज्यामुळे अनेक राशीच्या लोकांना यादरम्यान काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

वृषभवृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिन्यात होणारे ग्रह गोचर मध्यम फलदायी ठरतील. या दरम्यान, तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल, परंतु तुम्हाला शत्रूंमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमच्या वणीमध्ये कटुता वाढू शकते, त्यामुळे जास्त बोलणे टाळा, अन्यथा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, कौटुंबिक नातेसंबंधांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मंगळामुळे तुम्हाला काही परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे व्यवसाय चालवणे कठीण होऊ शकते. तसेच, तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. शनीच्या राशी बदलामुळे भागीदारीत काम करणाऱ्या व्यावसायिकांनी सावधगिरीने काम करावे, अन्यथा लाभाऐवजी नुकसान होऊ शकते.

सिंह

जून महिन्यात शनि, मंगळ, सूर्य या चार मोठ्या ग्रहांचे गोचर संमिश्र आणि फलदायी असेल. या काळात तुमच्या वागण्यात उग्रता येऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एकट्याने चालण्याची तुमची प्रवृत्ती तुमचे नुकसान करू शकते. दुसरीकडे, नोकरदार लोकांना सहकाऱ्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो, सहकाऱ्यांमुळे तयार प्रकल्प अडकू शकतात. दुसरीकडे, जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात यात अडचणी येऊ शकतात. मंगळामुळे या काळात मालमत्तेशी संबंधित वाद डोके वर काढू शकतात. यासोबतच पाय आणि पाठदुखीच्या तक्रारीही होऊ शकतात. बुध ग्रहामुळे जोडीदाराशी काही विषयावर वैचारिक मतभेद होऊ शकतात.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रमुख ग्रहांचे गोचर चढ-उतार करणारे असतील. या दरम्यान, पैशाचा योग्य वापर करा, कारण तुमचे खर्च वाढू शकतात, ज्यामुळे काही पैसे उधारही घेतले जाऊ शकतात. या काळात विचार न करता कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका कारण तुमच्या लोकांकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. मंगळामुळे जून महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांना उत्पन्न वाढ आणि नोकरीच्या बाबतीत काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच मुलांच्या संगतीचीही काळजी घ्यावी लागते. शनिमुळे वैवाहिक जीवनात सौम्य तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, परंतु प्रेम कायम राहील.

धनु

जून महिन्यात प्रमुख ग्रहांच्या राशी बदलामुळे धनु राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात एक ना एक समस्या कायम राहील, ज्यामुळे तुम्हाला आनंदाचे क्षण कमी पाहायला मिळतील, पण तुम्ही खंबीरपणे उभे राहाल, त्यामुळे समस्याही हळूहळू संपतील. नोकरदारांना मंगळामुळे अधिकाऱ्यांकडून मेहनतीची प्रशंसा मिळू शकणार नाही आणि कामाचा ताणही वाढेल. व्यापार्‍यांना या महिन्यात प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धा होऊ शकते. शनि वक्रीमुळे प्रवासादरम्यान अनेक गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे तुमच्या सामानाचीही काळजी घ्या.

कुंभकुंभ राशीच्या लोकांना जून महिन्यात ग्रहांच्या गोचरमुळे कामात लक्ष ठेवावे लागेल. या दरम्यान, थोडीशी चूक तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकते. तुमच्या कोर्ट कचेरीशी संबंधित कोणतेही प्रकरण चालू असेल तर थोडे पुढे जाण्याची शक्यता आहे. कुंभ वाहन चालवताना काळजी घ्या. मित्रांना कोणतेही रहस्य सांगणे टाळा, अन्यथा तुमच्यासाठी अडचणी येऊ शकतात. शनीच्या कारणामुळे कुंभ राशीच्या भावंडांशी संबंध बिघडू शकतात, त्यामुळे सावध राहा आणि एकमेकांची काळजी घ्या. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर मंगळामुळे काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुमचे खर्च वाढू शकतात.
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited