Shani Sade Sati: शनी साडेसातीचा 'या' तीन राशींवर फारसा प्रभाव पडत नाही

ज्योतिषशास्त्रात शनी साडेसातीबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची अशुभ दृष्टी असते त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Updated May 21, 2023 | 03:54 PM IST

Shani Sade Sati: शनी साडेसातीचा 'या' तीन राशींवर फारसा प्रभाव पडत नाही
Shani Sade Sati in marathi: ज्योतिषशास्त्रात शनी देव हे न्यायाचे देवता असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ते सर्वांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असतो त्यांना अनेक प्रकारच्या सुख-सुविधा प्राप्त होतात. तर ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनीची साडेसाती, शनी धैय्या, शनी महादशा यांचा प्रभाव असतो त्या व्यक्तींना मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या समस्यांचा सामना करावा लागतो.
ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे की, शनी सर्वात कमी वेगाने फिरतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी शनीला अडीच वर्षे लागतात. या काळात शनी अनेक प्रकारे आपला मार्ग बदलतो. पण त्यांचा प्रभाव तीन राशींवर फारच कमी असतो. शनी देवाला या तीन राशी खूप प्रिय असतात. जाणून घेऊयात कोणत्या या तीन राशी आहेत ज्यांच्यावर शनी साडेसातीचा प्रभाव कमी असतो.

या आहेत शनी देवाच्या प्रिय राशी

ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांच्या मते, शनी देव मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहे. शनीची उच्च राशी तूळ आहे. अशा स्थितीत या राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव खूपच कमी असतो.
ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत असते आणि शनीची साडेसाती सुरू असते. अशा स्थितीत शनीचा नकारात्मक प्रभाव कमी असतो. अशा स्थितीत शनी साडेसाती खूप फलदायी ठरते.
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर शनी तिसऱ्या, सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात असेल तर अशा परिस्थितीत शनीची दृष्टी कमकूवत असते. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना शनीच्या अशुभ प्रभावांना सामोरे जावे लागत नाही.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत किंवा असे केल्याने लाभ होतो असा दावाही आम्ही करत नाही.)
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited