Pradosh Vrat 2023: प्रदोष व्रत करताना ही बाब लक्षात ठेवा, तरच व्रत पूर्ण मानले जाईल

Pradosh Vrat June 2023: प्रदोष व्रताची कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने कधीही गरिबी येत नाही. प्रदोषाचे व्रत एका वेळी 11 किंवा 26 प्रदोषांसाठीच पाळले जाते. यानंतर त्याचे उद्यापन करावे.

Updated May 23, 2023 | 07:37 PM IST

Pradosh Vrat 2023, know the auspicious time and rules of worship

प्रदोश व्रत 2023: या व्रत बद्दलची माहिती

फोटो साभार : iStock
Pradosh Vrat: प्रदोष व्रत एका महिन्यात दोनदा येते, एक कृष्ण पक्षात तर दुसरे शुक्ल पक्षात. काही लोकं एका महिन्यात एकच प्रदोष व्रत करतात, तर काही लोकं दोन्ही करतात. शुक्ल पक्षाचे प्रदोष व्रत १ जून, गुरुवार रोजी सुरू होणार आहे. प्रदोष व्रत पाळणारी व्यक्ती जन्म-जन्माच्या चक्रातून बाहेर पडून मोक्षमार्गावर पुढे जाते अशी मान्यता आहे. हे व्रत करणाऱ्याला श्रेष्ठ जगाची प्राप्ती होते.
स्कंदपुराणानुसार जो मनुष्य प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून पूर्ण मनाने प्रदोष व्रताची कथा ऐकतो किंवा वाचतो, तो शंभर जन्म कधीही गरीब होत नाही.

प्रदोष व्रताचा महिमा

कलियुगात प्रदोष व्रत अतिशय शुभ मानला जातो, संध्याकाळाला प्रदोष काल असे म्हणतात. प्रदोष काळात महादेव कैलास पर्वताच्या रजत भवनात नृत्य करतात, अशी धारणा आहे. त्यामुळे हे व्रत पाळणाऱ्यावर महादेवांची सदैव कृपा असते. प्रदोष व्रत पाळल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात. अनेक संकटांपासून बचाव होतो.
असे मानले जाते की, प्रदोष व्रत पाळल्याने दोन गायींचे दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. प्रदोषाचे व्रत एका वेळी 11 किंवा 26 प्रदोषांसाठीच पाळले जाते. 11 किंवा 26 प्रदोष व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करावे लागते, करण त्यानंतरच या व्रताचा पूर्ण लाभ मिळू शकतो.
प्रदोष व्रत करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या पद्धतीने प्रदोष व्रत साजरे करा
प्रदोष व्रताचे उद्यान नेहमी योग्य पद्धतीने करावे. हे व्रत नेहमी त्रयोदशीलाच पाळावे. उद्यापनाच्या एक दिवस आधी श्री गणेश पूजन केले जाते आणि उद्यापनाच्या आदल्या रात्री जागरण केले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून कपडे आणि रांगोळीद्वारे मंडप सजवून घ्या. यानंतर 'ओम उमा महेश्वराय नमः' आणि 'ओम शिवाय नमः' मंत्राचा १०८ वेळा जप करून होम करावा.
होम संपल्यानंतर भगवान शंकराची आरती आणि शांतीपाठ करावा. त्यानंतर दोन ब्राह्मणांना खाऊ घाला आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन आपल्या इच्छेनुसार आणि योग्यतेनुसार दान करून त्यांना निरोप द्या. या पद्धतीने केलेले प्रदोष व्रताचे उद्यापन पूर्ण मानले जाते.
टीप: सदर लेख तुमच्या सामान्य माहितीसाठी दिला जात आहे, या लेखामधील पूजा सामग्रीचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हाच आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited