तुरटीचे हे 8 चमत्कारिक उपाय करा अन् नशीब बदला

तुरटीचा वापर अनेक कामांसाठी करण्यात येतो.पण तुरटीचा वापर करुन तुम्ही काही समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या तुरटीचे हे कोणते उपाय आहेत आणि त्याचा वापर कसा करावा.

Updated May 20, 2023 | 03:47 PM IST

तुरटीचे हे 8 चमत्कारिक उपाय करा अन् नशीब बदला
Turti che upay: अनेक घरांमध्ये तुरटी आढळून येते. तुरटीचे रासायनिक नाव पोटॅशियम अ‍ॅल्युमिनियम सल्फेट असे नाव असून ती जंतुनाशक म्हणून काम करते. तुरटी ही आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर तुरटीचा वापर करुन तुम्ही करिअर, आर्थिक समस्या यासोबतच इतरही समस्या दूर करु शकता. तुरटीत अनेक औषधी गुणधर्म असतात. पाणी स्वच्छ करण्यापासून ते रक्त थांबवण्यापर्यंत अनेक कामांत तुरटीचा उपयोग होतो. इतकेच नाही तर दाढी केल्यावर सुद्धा तुरटी चेहऱ्यावर लावण्यात येते.
तंत्रशास्त्रानुसार, तुरटीचे काही उपाय करुन तुम्ही आपले नशीब बदलू शकता. तुरटीत नकारात्मक ऊर्जा काढण्याची शक्ती असते तसेच सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवते. जाणून घेऊयात तुरटीच्या संदर्भातील काही उपाय....

तुरटीचा पहिला उपाय

दुकानात, व्यवसाच्या ठिकाणी किंवा इतर कामाच्या ठिकाणी प्रगती होत नसेल तर काळ्या कपड्यात तुरटी बांधून मुख्य दरवाजावर टांगावी. असे केल्याने कामात येणाऱ्या समस्या, कामाच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल.

तुरटीचा दुसरा उपाय

कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल आणि महागाईमुळे उत्पन्न कमी झाल्याचं वाटत असेल तर तंत्रशास्त्राचा हा उपाय तुमच्या कामाचा आहे. सुपारीच्या पानावर तोडी तुरटी आणि सिंदूर बांधून संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोठ्या दगडाखाली दाबून ठेवा. हा उपाय तुम्हाला तीन बुधवारी करावा लागेल. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल.

तुरटीचा तिसरा उपाय

कामात सातत्याने अडथळे निर्माण होत असतील तर दररोज आंघोळीच्या पाण्यात थोडी तुरटी मिसळा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील.

तुरटीचा चौथा उपाय

व्यवसायात भरभराट आणि कामात यश मिळवण्यासाठी नवमी तिथीला तुरटीचे पाच तुकडे, सहा निळी फुले दुर्गा मातेला अर्पण करा. त्यानंतर दशमी तिथीला वाहत्या पाण्यात निळी फुले वाहून द्या.

तुरटीचा पाचवा उपाय

धनलाभासाठी तुरटीचा एक सोपा उपाय तुमची मदत करु शकतो. धनलाभासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुरटीने आपले दात स्वच्छ करा. पाण्यात थोडे मीठ आणि तुरटी मिसळा. घरातील लादी पुसण्यासाठी हे पाणी वापरा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत किंवा असे केल्याने लाभ होतो असा दावाही आम्ही करत नाही.)
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited