Vastu Tips: वास्तूच्या 'या' नियमांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा व्हाल कर्जबाजारी

माहिती नसल्याने आपण अनेकदा लहान-मोठ्या अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे वास्तू दोष निर्माण होतो. अशा स्थितीत वास्तूच्या संबंधित काही चुका झाल्यास तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वास्तू शास्त्राच्या संबंधित नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घ्या या संदर्भात अधिक माहिती...

Updated May 22, 2023 | 03:56 PM IST

Vastu Tips: वास्तूच्या 'या' नियमांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा व्हाल कर्जबाजारी
Vastu Tips in Marathi: आपल्या सर्वांच्या आयुष्यात चांगले - वाईट दिवस येत असतात. आयुष्यात चढ-उतार येणे हा एक जीवनाचा एक भाग आहे. मात्र, काही संकट असे असतात ज्याची नुकसान भरपाई दीर्घकाळ करता येऊ शकत नाही. कर्जबाजारी होणं हे सुद्धा तसंच संकट आहे. वास्तूशास्त्रानुसार, घरातील चुकीचं वास्तू हे कुटुंबातील सदस्यांच्या जीवनातील समस्यांना प्रोत्साहन देतं. कुटुंबात होणारे वाद, कामात अडथळे निर्माण होणे, कर्जाचा भार वाढत जाणे या सारख्या समस्या वास्तूदोषामुळे होऊ शकतात. वास्तूच्या संदर्भातील एक साधारण अशी चूक तुमचं मोठं नुकसान करु शकते. वास्तूच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जाणून घेऊयात...

घराचं मुख्य द्वार कसं असावं?

वास्तूशास्त्रानुसार, कधीही घराच्या प्रवेशद्वारा जवळ कचराकुंडी, कचऱ्याचा डबा ठेवू नका. असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते आणि वास्तू दोष सुरू होतात. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा आणि त्याच्या आसपासचा परिसर हा नेहमी स्वच्छ असावा. दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजा जवळ तुपाचा दिवा लावा. तर कचऱ्याचा डबा हा नेहमी दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

असे जेवण करु नका

अनेकांना सवय असते की, हात-पाय न धुता आपल्या बेडवर किंवा सोफ्यावर जेवायला बसतात. वास्तूशास्त्रात या प्रकाराला सक्त मनाई करण्यात आली आहे. कारण, असे करणे त्या व्यक्तीला आर्थिक अडचणीत आणू शकते. त्यामुळे जेवण कधीही बेडवर करु नका आणि जेवणापूर्वी आपले हात-पाय नक्की धूवा.

किचनमध्ये करू नका ही कामे

रात्रीच्या सुमारास किचनमध्ये कधीही खरखटी असलेली भांडी ठेवू नका. रात्री जेवण झाल्यावर ही भांडी तात्काळ धुवून टाका. तसेच झोपण्यापूर्वी किचनची साफसफाई नक्की करा. किचनमधील भांडी तुम्ही तशीच ठेवल्यास आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच कुटुंबात कोणत्या ना कोणत्या समस्या सुरूच राहतात.

संध्याकाळी या वस्तू देऊ नका

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार, सायंकाळच्या सुमारास कधीही कुणालाही दूध, दही किंवा मीठ दान करू नका. असे केल्याने आर्थिक स्थिती कमकूवत होऊ शकते. तसेच कुंडलीतील चंद्राची स्थिती सुद्धा कमकूवत होते. जर खूपच आवश्यक असेल तर सकाळी द्या.

धार्मिक ग्रंथ, पुस्तके चुकीच्या ठिकाणी ठेवू नका

अनेकजण घरातील धार्मिक ग्रंथ किंवा पुस्तके हे चुकीच्या दिशेला ठेवतात. मात्र, हे शुभ नसल्याचं मानलं जातं. धार्मिक ग्रंथ किंवा पुस्तके नेहमी पश्चिम दिशेला ठेवा. काहीजण पुस्तके हे बेडखाली किंवा उशीखाली ठेवतात. मात्र, असे करणे चुकीचे आहे. असे केल्यास तुम्हाला विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही. तसेच असे केल्याने सुख-समृद्धी किंवा आर्थिक लाभ होतो असा दावा आम्ही करत नाही.)
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited