vinayak chaturthi 2023: विनायक चतुर्थीला जुळून येतोय खास योग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Vinayak Chaturthi 2023 Date: हिंदूधर्मात श्री गणपतीला आद्यपूजक मानले जाते. प्रत्येक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला शुभ मुहुर्तावर गणपतीची पूजा केली जाते. विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या जीवनातील सर्व प्रकारची विघ्ने दूर करतात, अशी भावना आहे.

Updated May 22, 2023 | 04:09 PM IST

Ganapati Bappa

Ganapati Bappa

Vinayak Chaturthi 2023 Date: विनायक चतुर्थीचे व्रत विघ्नहर्ता श्री गणपतीला समर्पित आहे. चतुर्थीला गणपतीची मनोभावे पूजा केल्याने ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होत असते. चला तर मग जाणून घेऊ या विनायक चतुर्थीचे शुभ मुहूर्त आणि पूजा विधी...
जुळून येत आहे खास संयोग
23 मे रोजी विनायक चतुर्थी आहे. या दिवशी अनोखा योग जुळून येत आहे. या दिवशी मंगळ आहे. त्यामुळे हनुमानाची देखील पूजा करावी. गौरी पुत्र गणपती आणि हनुमानाच्या आशीर्वादाने भाविकांच्या जीवनातील प्रत्येक संकंट दूर होईल. राहु-केतुचा दुष्प्रभावातून देखील भाविकाची सुटका होईल. मंगळ दोष दूर करण्यासाठी हनुमानची पूजा करावी.
विनायक चतुर्थीचं महत्त्व (Vinayak Chaturthi Significance)
गणपतीला विनायक असे संबोधले जाते. विघ्नहर्ता गणपतीच्या पूजेने सुख शांती प्राप्त होते. घरात ऐश्वर्य नांदते.
गणपती पूजन आणि सायंकाळी चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर विनायक चतुर्थीचे व्रत पूर्ण होते.
गणपतीची आराधना केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते चंद्रदोष देखील दूर होतात. संतती प्राप्त होऊन व्यापार-व्यवसायातील अडचणी दूर होतात.
विनायक चतुर्थीला 22 मे रोजी रात्री 11 वाजून 18 मिनिटांला सुरूवात होत असून 23 मे रोजी रात्री 12 वाजून 57 मिनिटांला समाप्त होईल.
विनायक चतुर्थीला या मंत्राचा जप करा.. (Mantra Jap)
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः।
निर्विघ्नं कुरु में देव सर्वकार्येषु सर्वदा।।
विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त (Vinayak Chaturthi Muhurt)
23 मे रोजी सकाळी 10 वाजून 59 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 47 मिनिटांदरम्यान विनायक चतुर्थीची व्रत पूजेचा शुभ मुहूर्त आहे.
कशी कराल गणपतीची पूजा (Vinayak Chaturthi Puja)
1. विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. घरात साफसफाई करून गंगाजल किंवा गोमूत्राने शुध्दीकरण करावे.
2. स्नान, ध्यान करत व्रतचा संकल्प करावा.
3. सूर्याला अर्घ्य देऊन गणपतीला पिवळे फळ-फूल, धूप दीप, अक्षता, चंदन, दूर्वा अर्पण करावे.
3. गणपतीला मोदकाचा नैवेद्य द्यावा.
4. गणपती स्त्रोत्र, मंत्रांचा जप करावा. गणेश चालीसाचा पाठ करावा.
5. व्रत काळात केवळ एकदाच फलाहार घ्यावा. सायंकाळी चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर गणपती आरती करावी. त्यानंतर उपवास सोडावा.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited