'आम्ही पाकिस्तानात जाणार नाही', श्रीलंकेच्या १० दिग्गज खेळाडूंचा नकार 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 09, 2019 | 23:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

श्रीलंका क्रिकेट संघाच्या १० खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता या दौऱ्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

SRI_LANKA
'आम्ही पाकिस्तानात जाणार नाही', श्रीलंकेच्या खेळाडूंचा नकार  |  फोटो सौजन्य: AP

कोलंबो: श्रीलंकेच्या टी२० संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि माजी कर्णधार एंजोलो मॅथ्यूज, थिसारा परेरा यांच्यासह तब्बल १० खेळाडूंनी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. श्रीलंक क्रिकेट बोर्डाने सुरुवातीला टीममध्ये सामिल झालेल्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत माहिती दिली. कारण की, २७ सप्टेंबरपासून श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. पण याच वेळी संघातील १० खेळाडूंनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. 

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आज खेळाडूंच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत एका बैठकीचं आयोजन केलं होतं. श्रीलंकेचे माजी एअरफोर्स कमांडर मार्शल एअर रोशन गुनेतिलेका (श्रीलंका क्रिकेटचे सुरक्षा सल्लागार) यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची तयारी आणि पाकिस्तानमधील सुरक्षेविषयीची परिस्थिती याबाबत श्रीलंकन खेळाडूंना माहिती दिली. तर निवड समितीचे प्रमुख असंथा डीमेल यांनी भविष्यातील दौऱ्यांबाबत निवड आणि त्याविषयची माहिती खेळाडूंना दिली. या बैठकीनंतर श्रीलंक क्रिकेटने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलं की, १० खेळाडू हे पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास तयार नाहीत.  
  
1. निरोशन डिकवेला

2. कुसल जेनिथ परेरा

3.धनंजय डी सिल्वा

4. थिसारा परेरा

5. अकिला धनंजय

6. लसिथ मलिंगा

7. एंजेलो मॅथ्यूज

8. सुरंगा लकमल

9. दिनेश चंडीमल

10. दिमुथ करुणारत्ने

या खेळाडूंनी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. 

या दौऱ्यापासून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु व्हावं असा पीसीबीचा प्रयत्न आहे. पण अद्याप तरी श्रीलंकन खेळाडू या दौऱ्यासाठी तयार नसल्याने या दौऱ्याबाबत संभ्रम कायम आहे. 

दुसरीकडे याबाबत बोलताना श्रीलंकेचा फलंदाज धनुष्का गुणतिलके असं म्हणाला की, 'त्यांनी आम्हाला जे काही सांगितलं आहे त्यानुसार मला असं वाटतं की, तिथे कडक सुरक्षा व्यवस्था असेल. त्यामुळे सुरक्षेसंबंधी तिथे तडजोड केली जाणार नाही असं वाटतं.' त्यामुळे आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड पाकिस्तान दौऱ्यावर आपला संघ पाठविणार की नाही याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. 

दरम्यान, २००९ मध्ये पाकिस्तानमध्येच श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे तेव्हापासून कोणताही संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला नव्हता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...