मुंबई: भारतीय संघ एकीकडे झिम्बाब्वेविरुद्ध(india vs zimbabwe) वनडे मालिकेमध्ये(one day series) दोन हात करत आहे. तर दुसरीकडे खराब फॉर्मात असलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली(team india former captain virat kohli) सध्या कुटुंबियांसह वेळ घालवत आशिया कपची(asia cup) तयारी करत आहे. नुकताच त्याचा जिममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र शुक्रवारी अचानक सोशल मीडियावर(social media) विराट कोहलीच्या नावासह १००० डेज(1000 days) व्हायरल होऊ लागले. सुरूवातीला चाहत्यांना समजले नाही की असे का होत आहे मात्र काही वेळानंतर चित्र स्पष्ट झाले. 1000 days trend with virat kohli on social media
अधिक वाचा - एकनाथ शिंदे प्रकरणात मतदारांच्या वतीने हस्तक्षेप याचिका
विराट कोहली आणि १००० यांच्यातील सरळ संबंध असा होता की विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकल्यानंतर १००० दिवस झाले आहेत. विराटने शेवटचे शतक २२ नोव्हेंबर २०१९ला बांगलादेशविरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डन्समध्ये डे-नाईट कसोटीदरम्यान ठोकले होते. त्यानंतर आतापर्यंत विराटला एकदाही कोणत्याच फॉरमॅटमध्ये शतक ठोकता आलेले नाही. चाहते गेल्या १ हजार दिवसांपासून विराटच्या शतकाची प्रतीक्षा करत आहेत.
1,000 days — England's Barmy Army (@TheBarmyArmy) August 19, 2022
3,532 days since England last won any format series against India in India. 😉 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 19, 2022
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके ठोकलेल्या विराटने तब्बल १ हजार दिवसांपासून शतक ठोकलेले नसले तरी मात्र सर्वाधिक शतकांच्या यादीत त्याचे नाव अद्याप समाविष्ट आहे. तो सचिन तेंडुलकर(१००) आणि रिकी पाँटिंग(७१) यांच्यानंतर सार्वकालिक सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकणाऱ्यांच्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक शतक ठोकताच तो पाँटिंगची बरोबरी करेल.
अधिक वाचा - उत्सव काळा डाॅल्बीसाठी उदयनराजे आग्रही
या वादात जेव्हा इंग्लंडच्या क्रिकेट फॅन्सचा क्लब बर्मी आर्मी उतरला तेव्हा विराटच्या चाहत्यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. बर्मी आर्मीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर १००० डेज असे ट्वीट केले त्यावर इंग्लंडच्या संघाला भारतात कोणत्याही फॉरमॅटमध्ये मालिका जिंकण्याला ३५३२ दिवस झाले आहेत. अशातच विराटवर टीका करणारे बॅकफूटवर आलेत.