Cricket Records: १४ फलंदाजांनी कसोटीत गाठला १० हजार धावांचा टप्पा; यादीत ३ भारतीयांचाही समावेश 

10,000 runs in Test | १९८७ मध्ये सर्वप्रथम कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या एका खेळाडूने १० हजार धावांचा टप्पा गाठला होता. हा ऐतिहासिक विक्रम भारतीय सलामीवीर फलंदाज सुनिल गावस्कर यांनी केला होता.

14 batsman reach 10,000 runs in Tests, The list also includes 3 Indians
आतापर्यंत १४ फलंदाजांनी कसोटीत गाठला १० हजार धावांचा टप्पा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • १९८७ मध्ये सर्वप्रथम कसोटीमध्ये वैयक्तिक १० हजार धावांचा टप्पा गाठला होता.
 • हा आकडा सुनिल गावस्करांनी गाठला होता.
 • भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून सर्वाधिक फलंदाजांनी १० हजार धावा केल्या.

Most Runs in Test । मुंबई : १९८७ मध्ये सर्वप्रथम कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या एका खेळाडूने १० हजार धावांचा टप्पा गाठला होता. हा ऐतिहासिक विक्रम भारतीय सलामीवीर फलंदाज सुनिल गावस्कर यांनी केला होता. लक्षणीय बाब म्हणजे गावस्करांच्या आधी या आकड्यापर्यंत पोहचण्यासाठी कोणत्याच फंलदाजाला यश आले नव्हते. अलीकडेच सुनिल गावस्कर यांनी या आकड्यापर्यंत पोहचणे म्हणजे पहिल्यांदाच माउंट एव्हरेस्टवर चढल्यासारखे आहे असे म्हटले आहे. मात्र त्याच्यानंतर ३५ वर्षात आणखी १३ फलंदाजांनी हा मोठा आकडा गाठण्याची किमया साधली आहे. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण १४ फलंदाजांनी १० हजार धावा केल्या आहेत. (14 batsman reach 10,000 runs in Tests, The list also includes 3 Indians). 

अधिक वाचा : ... म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड फूड सेफ्टी डे

कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठणारे फलंदाज

 1. सचिन तेंडुलकर - १५,९२१ (भारत)
 2. रिकी पॉंटिंग - १३,३७८ (ऑस्ट्रेलिया)
 3. जॅक्स कॅलिस - १३, २८९ (दक्षिण आफ्रिका)
 4. राहुल द्रविड - १३,२८८ (भारत)
 5. ॲलिस्टर कुक - १२,४७२ (इंग्लंड)
 6. कुमार संगकारा - १२,४०० (श्रीलंका)
 7. ब्रायन लारा - ११,९५३ (वेस्टइंडिज)
 8. शिवनारायण चंद्रपॉल- ११,८६७ (वेस्टइंडिज)
 9. महेला जयवर्धन - ११,८१४ (श्रीलंका)
 10. ॲलन बॉर्डर - ११,१७४ (ऑस्ट्रेलिया)
 11. स्टीव्ह वॉ - १०,९२७ (ऑस्ट्रेलिया)
 12. सुनील गावस्कर - १०,१२२ (भारत)
 13. युनूस खान - १०,०९९ (पाकिस्तान)
 14. जो रूट - १०,०१५ (इंग्लंड)

कोणत्या संघातील किती खेळाडूंनी पार केला हा आकडा

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून सर्वाधिक फलंदाजांनी १० हजार धावा केल्या. या दोन्ही संघातील ३-३ खेळाडूंनी हा आकडा पार केला. इंग्लंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजकडून प्रत्येकी २-२ आणि दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी एका खेळाडूने हा आकडा गाठला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी