Ranji Trophy 2022 QF: २१ वर्षीय सुवेदचं धमाकेदार पदार्पण, रणजीच्या उपांत्यपूर्व फेरीत ठोकलं द्विशतक

कोणत्याही खेळाडूसाठी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy ) खूप महत्त्वाची मानली जाते. सध्या रणजी ट्रॉफीचे बाद फेरी म्हणजेच उपांत्यपूर्व सामने खेळवले जात आहेत. सध्या मुंबई (Mumbai) आणि उत्तराखंड(Uttarakhand) यांच्यात हा सामना होत असून या सामन्यात मुंबईच्या सुवेद पारकरने (Suved Parkar) पदार्पणातच शानदार खेळी केली आहे. पहिल्याच सामन्यात या फलंदाजाने द्विशतक (Double century) झळकावले आहे.

 Suved Parkar hits double century in Ranji semifinals
सुवेद पारकरनं रणजीच्या उपांत्यपूर्व फेरीत ठोकलं द्विशतक   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मुंबईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांची सुरुवात चांगली झाली नाही.
  • ३७५ चेंडू खेळत सुवेदने १७ चौकार आणि ३ षटकारांसह द्विशतक ठोकलं.
  • नॉक-आउट सामन्यात पदार्पण करताना द्विशतक झळकावणारा सुवेद हा रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरा फलंदाज

नवी दिल्ली :  कोणत्याही खेळाडूसाठी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy ) खूप महत्त्वाची मानली जाते. सध्या रणजी ट्रॉफीचे बाद फेरी म्हणजेच उपांत्यपूर्व सामने खेळवले जात आहेत. सध्या मुंबई (Mumbai) आणि उत्तराखंड(Uttarakhand) यांच्यात हा सामना होत असून या सामन्यात मुंबईच्या सुवेद पारकरने (Suved Parkar) पदार्पणातच शानदार खेळी केली आहे. पहिल्याच सामन्यात या फलंदाजाने द्विशतक (Double century) झळकावले आहे.

दरम्यान, नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार पृथ्वी शॉ २१ धावा करून माघारी परतला तर दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ३५ धावांवर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सुवेदने अरमान जाफरसह मुंबईचा डाव सांभाळला. अर्धशतक झळकावल्यानंतर जाफर बाद झाला, पण पदार्पण करणाऱ्या सुवेदने सरफराजसोबत २६७ धावांची अतुलनीय भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. 

पदार्पणात द्विशतक

रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत पदार्पण करणाऱ्या या फलंदाजाने १२३ चेंडूत पहिले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर २०६ चेंडूत 8 चौकार आणि २ षटकार ठोकत त्याने आपले प्रथम श्रेणीतील शतक पूर्ण केले. पण सुवेद इथेच थांबला नाही, त्याने त्याची धावसंख्या दीडशेच्या पुढे नेली. २९० चेंडू खेळल्यानंतर सुवेदने कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात १५० धावांचा टप्पाही पार केला. ३७५ चेंडू खेळत या तरुणाने १७ चौकार आणि ३ षटकारांसह द्विशतक झळकावले. 

नॉकआउट सामन्यात द्विशतक

नॉक-आउट सामन्यात पदार्पण करताना द्विशतक झळकावणारा सुवेद हा रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी १९९४ मध्ये अमोल मजुमदारने हरियाणाविरुद्ध द्विशतक झळकावून इतिहास रचला होता. सुवेद आता अमोलच्या यादीत सामील झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी