Six in over: एका ओव्हरमध्ये मारले ८ सिक्स, बनल्या ५० धावा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 21, 2021 | 20:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोरंटो डनक्रेग सीनियर क्बल आणि किंग्सले-वुडवाले सीनियर क्लब यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान सोरेंटो डनक्रेग सीनियर क्लबकडून खेळताना फलंदाज सॅम हॅरिसनने एका ओव्हरमध्ये ८ सिक्स मारले.

cricket
एका ओव्हरमध्ये मारले ८ सिक्स, बनल्या ५० धावा 
थोडं पण कामाचं
  • सोरंटो डनक्रेग सीनियर क्बल आणि किंग्सले-वुडवाले सीनियर क्लब यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान हा रेकॉर्ड झाला.
  • नॅथन बेनेटने एका ओव्हरमध्ये हा रेकॉर्ड केला.
  • आपल्या ओव्हरमध्ये दोन नोबॉल टाकले. याच कारणामुळे ही ओव्हर ८ बॉलची झाली.

मुंबई: एका ओव्हरमधील ६ बॉलवर ३६ धावा होऊ शकतात. अशी धडाकेबाज कामगिरी अनेक क्रिकेटर्सनी केली आहे. २००७च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराज सिंगने ६ चेंडूवर ६ सिक्स मारले होते.. मात्र एका ओव्हरमध्ये तब्बल ८ सिक्स मारले जाऊ शकतात का? हे खरं आहे. अशीच धडाकेबाज कामगिरी एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने क्बल क्रिकेट सामन्यादरम्यान केली. 

सोरंटो डनक्रेग सीनियर क्बल आणि किंग्सले-वुडवाले सीनियर क्लब यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान सोरेंटो डनक्रेग सीनियर क्लबकडून खेळताना फलंदाज सॅम हॅरिसनने एका ओव्हरमध्ये ८ सिक्स मारले. नॅथ बेनेटने एका ओव्हरमध्ये हा रेकॉर्ड केला. नॅथनने आपल्या ओव्हरमध्ये दोन नोबॉल टाकले. याच कारणामुळे ही ओव्हर ८ बॉलची झाली. ८ बॉलवर हॅरिसनने सिक्स ठोकले. ही कामगिरी हॅरिसनने ३९व्या ओव्हरमध्ये ही कामगिरी केली. यासोबतच त्याने एका ओव्हरमध्ये तब्बल ५० धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजाने यासोबतच आपल्या ५० धावाही पूर्ण केल्या. तसेच ४०व्या ओव्हरमध्ये त्याने आपले शतकही पूर्ण केले. यात त्याने २२ बॉलवर शतक ठोकले. 

सोरंटोने ४० ओव्हररमध्ये बनवल्या २७६ धावा

सोरेंटो डनक्रेगने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ४० ओव्हरमध्ये २७६ धावा केल्या. यात त्यांच्या दोन फलंदाजांनी शतक ठोकले. यात एक सॅम हॅरिसन होता. 

याआधीही एका ओव्हरमध्ये बनवले होते ७७ रन्स

हे काही पहिल्यांदाच जाले नाही की एखाद्या फलंदाजाने एका ओव्हरमध्ये ३६पेक्षा जास्त धावा केल्या. न्यूझीलंडमध्ये एका फर्स्ट क्लास मॅचमध्ये बर्ट वेन्सने एका ओव्हरमध्ये ७७ धावा केल्या होता. हा आतापर्यंतचा न मोडला गेलेला रेकॉर्ड आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी