IPL मध्ये पृथ्वी शॉ अडचणीत, माॅडेल सपना गिलकडून विनयभंग केल्याचा आरोप

Criminal complaint against prithvi shaw : आयपीएल टीम दिल्ली कॅपिटल्सचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध माॅडेल सपना गिलने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

।A case has been filed against Prithvi Shaw for molesting model Sapna Gill
IPL मध्ये पृथ्वी शॉ अडचणीत, माॅडेल सपना गिलचा विनयभंग केल्याचा आरोप   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात बाचाबाची
  •  सपना गिल हिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल
  • मेडिकल सर्टिफिकेटही जोडलं

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामाची दमदार सुरुवात झाली. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ अडचणीत सापडला आहे. सोशल इन्फ्यूजर सपना गिल हिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. (A case has been filed against Prithvi Shaw for molesting model Sapna Gill )

अधिक वाचा : IPL 2023: खलील अहमदने रचला LSG विरुद्ध इतिहास, IPL मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला गोलंदाज

पृथ्वी शॉ सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत दोन सामने खेळले असून, त्याने 19 धावा केल्या आहेत. त्याचदरम्यान, सपना गिलने बॅटने मारहाण आणि विनयभंगासह काही प्रकरणांमध्ये आयपीसीच्या कलम 354, 509, 324 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. सपनाने ही तक्रार नोंदवताना सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्रही दिले आहे. ज्यामध्ये लैंगिक अत्याचाराचाही उल्लेख आहे. 

अधिक वाचा : SRH vs RR IPL 2023: आज हैदराबादचा संघ भिडणार राजस्थानशी; गोलंदाज भारी पडणार की फलंदाज

काय आहे हे प्रकरण

हे संपूर्ण प्रकरण फेब्रुवारीचे आहे, जेव्हा पृथ्वी शॉ त्याच्या मित्रासोबत सांताक्रूझमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. त्यादरम्यान दोन लोकांनी पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढला, मात्र तेच लोक पुन्हा आले आणि इतर लोकांसोबतही सेल्फी घेण्यास सांगितले. पण पृथ्वी शॉने नकार दिला. यावरुन दोन्ही बाजूंकडून बाचाबाची झाली. यानंतर, पृथ्वी शॉच्या मित्राच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सपनासह 8 जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सपना गिललाही अटक करण्यात आली होती. सध्या सपना जामिनावर बाहेर आहे. या प्रकरणाचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या व्हिडिओंमध्ये पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात भांडणही पाहायला मिळत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी