Commonwealth Games: भारताच्या सुधीरचा नवा विक्रम, पॅरा पॉवरलिफ्टिंग मिळवलं सुवर्णपदक

India's Sudhir wins the 1st ever gold medal in Para Powerlifting :  भारताच्या (India) सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंग ((Para Powerlifting)  पुरुषांच्या हेवीवेट (Heavyweight) फायनलमध्ये १३४.५ गुणांसह सुवर्णपदकाला (gold medal) गवसणी घातली. सुधीरने पहिल्या प्रयत्नात २०८ किलो वजन उचलले आणि १३४.५ गुण मिळवत विक्रम रचला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

 CWG2022 : Sudhir wins first gold medal in Para Powerlifting
CWG2022 : सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंग मिळवलं पहिलं सुवर्णपदक  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सुधीरने पहिल्या प्रयत्नात २०८ किलो वजन उचलले आणि १३४.५ गुण मिळवत विक्रम रचला.
  • कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारताचं हे सहावं सुवर्णपदक आहे.

नवी दिल्ली : भारताच्या (India) सुधीरने गुरुवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) पुरुषांच्या हेवीवेट (Heavyweight) पॅरा पॉवरलिफ्टिंग (Para Powerlifting) स्पर्धेत सुवर्णपदकाला (Gold medal) गवसणी घातली. आशियाई पॅरा गेम्सच्या (Asian Para Games) कांस्यपदक विजेत्या (Bronze medalist) सुधीरने यावेळी पहिल्या प्रयत्नात २०८ किलो वजन उचलले आणि १३४.५ गुण मिळवत विक्रम रचला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारताचं हे सहावं सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण वीस पदकं जिंकली आहेत. कॉमनवेल्थ २०२२ च्या पदकतालिकेत भारत सातव्या क्रमांकावर आहे. 

पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सुधीरने भारतासाठी पॅरा स्पोर्ट्समध्ये पदकाचे खाते उघडले. पुरुषांच्या हेवीवेट प्रकारात प्रथम आल्यावर त्याने राष्ट्रकुल स्पर्धेमधील भारताचे सहावे सुवर्ण जिंकले. त्याने १३४.५ गुण मिळवले आणि त्याने संपूर्ण स्पर्धेत अव्वल क्रमांक आपल्याकडेच ठेवला. त्याचबरोबर सुधीरने नवीन खेळ विक्रम प्रस्थापित केला.

Read Also : ५ ऑगस्टला सूर्याप्रमाणे चमकेल या राशींचे भाग्य

या विजयासह भारताची सहा सुवर्णपदके झाली असून ते पदकतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. सुधीरने दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले जे त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी पुरेसे होते. नायजेरियाच्या ख्रिश्चन ओबिचुकवू आणि स्कॉटलंडच्या मिकी युलने अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.

लॉन्ग जंपमध्ये श्रीशंकरनं पटकावलं रौप्यपदक

केरळमधील पलक्कड येथील २३ वर्षीय एम श्रीशंकरने लांब उडीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला पुरुष भारतीय खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत श्रीशंकर हा सहावा होता. पण फक्त एकाच दमदार उडीच्या जोरावर त्याने दुसरा क्रमांक गाठला आणि रौप्यपदकाला गवसणी घातली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडीत भारताच्या दोन महिलांनी पदक जिंकले होते, पण पुरुषांमध्ये पदक जिंकणारा श्रीशंकर हा पहिलाच भारतीय ठरला.

Read Also : न्यायमूर्ती उदय ललित होणार भारताचे 49 वे सरन्यायाधीश

भारतासाठी कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी-

सुवर्णपदक- 6  (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर)

रौप्यपदक- 7 (संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर.)

कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह,  तेजस्वीन शंकर.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी