T20 Captain Aaron Finch Retirement: सध्या ऑस्ट्रेलियन टीम ( Australia team) भारत दौऱ्यावर आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) या चार कसोटी सामन्यांची सीरीज खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला आहे. ऑस्ट्रेलियन टीम भारतात असताना, त्यांच्या T20टीमच्या कर्णधाराने (captain)निवृत्तीची (Retirement) घोषणा केली आहे. टी20 कर्णधार एरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या (International cricket) सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सप्टेंबर 2022 मध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटला (ODI Cricket) रामराम ठोकला होता. (Aaron Finch Retirement: Aaron Finch a powerful player who scored 172 runs in 76 balls, retired from cricket)
अधिक वाचा : हृदयविकाराच्या झटक्याची 8 लक्षणे प्रत्येक स्त्रीला माहीत असणं आहे आवश्यक
आपल्या निवृत्तीची घोषणा करताना फिंच म्हणाला की, 2024 मध्ये होणाऱ्या पुढील टी-20 विश्वचषकापर्यंत मी खेळू शकणार नाही, हे लक्षात घेऊन पद सोडण्याची आणि संघाला नियोजन करण्यासाठी वेळ देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांनी आपल्या कुटुंबा आणि चाहत्याविषयी म्हणाला की, मी आपल्या कुटुंबात, विशेषत: माझी पत्नी एमी, माझ्या संघातील सदस्य, क्रिकेट व्हिक्टोरिया, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशनचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी मला आवडणारा खेळ खेळण्याची परवानगी दिली. माझ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानू इच्छितो.
अधिक वाचा : काय आहेत निद्रानाश होण्याची कारणे
आपल्या करिष्माई खेळाविषयी बोलताना फिंच म्हणाले की, 2021 मधील T20 विश्वचषक आणि 2015 मध्ये मायदेशातील एकदिवसीय विश्वचषकातील पहिला विजय माझ्यासाठी नेहमीच उत्कृष्ट क्षण असेल. 12 वर्षे ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणे, सर्व काळातील महान खेळाडूंसोबत खेळणे हा एक अविश्वसनीय सन्मान असल्याचं त्याने म्हटलं आहे.
अधिक वाचा : डोळ्यांवर चष्मा नको तर करा हे घरगुती उपाय
दरम्यान, फिंचच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाला T20 टीमसाठी नव्या कॅप्टनची निवड करावी लागणार आहे. एरॉन फिंचने मागच्यावर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याचवेळी तो टी 20 क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती घेईल, असा अंदाज होता. बिग बॅश लीगनंतर भविष्याबद्दल निर्णय घेईन, असं त्याने सांगितलं होतं. आता ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग संपले असून त्याने आता निवृत्तीची घोषणा केली आहे. फिंचने आपल्या करिअरमध्ये 5 टेस्ट, 146 वनडे आणि 103 T20 सामने खेळले आहेत. 36 वर्षाचे एरॉन फिंच हे आयसीसी पुरुष क्रिकेट विश्व कप 2015 जिंकणाऱ्या संघाचे एक भाग होते. फिंचने 2021मध्ये टी20 विश्व कपसाठी कर्णधारपदाची जबाबदारी घेतली होती.
मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी एरॉन फिंचने ऑस्ट्रेलियाच नेतृत्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन टीम वर्ल्ड कपच्या सेमीफायनपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरली. दुखापतीमुळे तो टुर्नामेंटमधील अफगाणिस्तान विरुद्ध शेवटचा सामना खेळू शकला नव्हता. भले फिंचच नेतृत्व मागच्या वर्ल्ड कपमध्ये कमी पडलं असेल, पण त्याच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2021 मध्ये पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी न्यूझीलंडला हरवून ऑस्ट्रेलियन टीमने चॅम्पियनशिपचा किताब जिंकला होता.
फिंच हा ऑस्ट्रेलियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 34.28 च्या सरासरीने आणि 142.53 च्या स्ट्राइक रेटने 3120 धावा केल्या आहेत. 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्याने केलेली 172 धावांची सर्वोच्च धावसंख्या अजूनही एक विक्रम आहे.