cricket stories : आरूशच्या ७८ चेंडूत नाबाद १०४ धावा, रुमेद सी ए संघाचा नऊ विकेटने विजय 

cricket u-14 premier league । मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल अंडर १४ प्रिमिअर लीग २०२१ स्पर्धेत   रुमेद सी ए संघाने एकतर्फी सामन्यात अॅडव्हान्स क्रिकेट अकादमीचा नऊ गडी राखून  पराभव केला. 

Aarush's unbeaten 104 off 78 balls, Rumed CA's nine-wicket win late ram baran memorial trophy premier league
cricket stories : आरूशचे ७८ चेंडूत नाबाद १०४, रुमेद विजयी 
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल अंडर १४ प्रिमिअर लीग २०२१ स्पर्धा
  • अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर 14 स्पर्धेचे आयोजन करतात.
  • रुमेद सी ए संघाने एकतर्फी सामन्यात अॅडव्हान्स क्रिकेट अकादमीचा नऊ गडी राखून  पराभव केला. 

cricket stories  । मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल अंडर १४ प्रिमिअर लीग २०२१ स्पर्धेत   रुमेद सी ए संघाने एकतर्फी सामन्यात अॅडव्हान्स क्रिकेट अकादमीचा नऊ गडी राखून  पराभव केला. 

अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १४ स्पर्धेचे आयोजन करतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धा झाल्या नाही. यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने छोट्या स्पर्धा  सर्व मार्गदर्शक नियम पाळून घेण्याची परवानगी मिळाली.  ४ जानेवारी रोजी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. 

या स्पर्धेचा लिग सामन्यात   सुरूवातीला फलंदाजी करताना अॅडव्हान्स क्रिकेट अकादमीने निर्धारित ४० षटकात ९ बाद १८० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या रुमेद सीए संघाने  अवघ्या २३.५ व्या षटकापर्यंत १ गडी गमावत विजयश्री गाठला. रुमेद सी संघाकडून आरूश याने अवघ्या ७८ चेंडून १८ चौकारांच्या मदतीने १०४ धावांची नाबाद खेळी केली. जियान मारू याने त्याला नाबाद ३६ धावा करून चांगली साथ दिली. 

cricket stories : अत्यंत चुरशीच्या सामन्यात सहा चेंडू आणि एक विकेट राखून स्पीड स्पोर्ट्स संघाचा थरारक विजय 

पाहा स्कोअर कार्ड 

s

लीगमधील दुसऱ्या एका सामन्यात  स्पीड स्पोर्टस संघाने  रुमेद सीएस संघावर १९ धावांनी थरारक विजय मिळविला. सुरूवातीला फलंदाजी करताना स्पीड स्पोर्ट्स संघाने निर्धारित ४० षटकात ९ बाद १५८ धावा केल्या. त्याला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या रुमेद संघ अवघ्या ३५.३ षटकात १३९ धावांवर गारद झाला. 

स्पीड स्पोर्ट्स संघाकडून साद साखरकर  ३३, वेद २७ धावा केल्या तर रुमेद सीए कडून सर्वाधिक धावा सौमिक आहेर २९ याने काढल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी