जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डेविलियर्स(south africa former captain ab de villiers) आणि त्याची पत्नी डेनियल विलियर्स(denial villiers) गेल्या आठवड्यात तिसऱ्या बाळाला(baby birth) जन्म दिला. डिविलियर्सने इन्स्टाग्रावर ही खुशखबर आपल्या चाहत्यांना दिली आहे. ११ नोव्हेंबरला त्याच्या बाळाचा जन्म झाला. विकेटकीपर फलंदाजाने या पोस्टमध्ये तिसऱ्या बाळाच्या नावाचा खुलासाही केला आहे.
एबी डेविलियर्सने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले, ११-११-२०२०ला आम्ही सुंदर मुलीचे स्वागत केले. येंटे डेविलियर्स. तु आमच्या कुटुंबातील परफेक्ट जोड आहे. तुला खूप सारे आशीर्वाद.
यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेण्याच्या एक महिन्याआधी डेविलियर्सची पत्नीने गरोदर असल्याची घोषणा केली होती आणि खुलासा केला होता की ते तिसऱ्या बाळाचे लवकरच स्वागत करत आहेत. आयपीएलमध्ये डेविलियर्सने सलग १०व्या वर्षी आरसीबीचे प्रतिनिधित्व केले. तो आयपीएलनंतर ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये भाग घेणार होता मात्र कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तो बिग बॅशमध्ये खेळणार नाही.
डेविलियर्सने २०१३मध्ये डॅनियलसोबत लग्न केले होते. डेविलियर्सने खुलासा केला होता की आयपीएल २०१३दरम्यान त्याने डेनियलला प्रपोज करण्याचे ठरवले होते. एबीडीने एका शोमध्ये म्हटले होते, आयपीएल सुरू होण्याच्या काही महिनेआधी मी प्लान केला होता. अंगठीही खरेदी केली होती. ताज महलमध्ये प्रपोज करण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा मी आयपीएलमध्ये पोहोचलो तेव्हा मला सुरक्षा गार्ड्स मिळाले. मात्र मी डेनियलला म्हटले होते की मला सुरक्षा गार्ड्ससोबत प्रवास करावा लागेल. त्यांनाही आपल्यासोबत यावे लागेल. हे चांगले सरप्राईज होते आणि हे सगळं कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
एबी डेविलियर्सने २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि यानंतर तो अधिकचा वेळ आपल्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. त्याने निवृत्तीनंतर काही टी-२० लीगमध्ये भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास अद्याप हे निश्चित झालेले नाही की डेविलियर्स टी-२० वर्ल्डकपमध्ये भाग घेणार की नाही. तो इंग्लंडविरुद्ध आगामी टी-२० इंटरनॅशनल सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीमचा भाग नाही आहे.