बर्मिंगहॅम : इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) वेटलिफ्टिंगमध्ये भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळाले. भारताचा २० वर्षांचा पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील रहिवासी वेटलिफटर अचिंत शिऊली (Achinta Sheuli) याने पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात एकूण ३१३ किलो वजन उचलून सुवर्ण पदक (gold medal) जिंकले. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर शिऊलीच्या नावाचा शोध सुरू झाला आहे. राष्ट्रकूल स्पर्धेत भारताचा अभिमान वाढवणारा अचिंत्य शिऊली कोण आहे, काय करायचा असे प्रश्न विचारली जात आहेत. या प्रश्नांची उत्तर आम्ही या लेखातून देत आहोत.
अचिंत शिउली यांचा जन्म 24 नोव्हेंबर 2001 रोजी पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील डुएलपूर येथे झाला. त्यांचे बालपण मोठ्या संघर्षात गेले. त्याचे वडील सायकल रिक्षा चालवायचे, तो आठवीत शिकत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्यानं दु:खात सर्व कुटुंबीय अजून एका संकटात सापडले. घरातील कर्ता गेल्यानंतर घराचं पालन-पोषण होणाऱ्या पोल्ट्रीफॉर्मवर लांडग्यांनी हल्ला केला अन् कोंबड्या फस्त केला. मानसीक धक्क्यानंतर कुटुंबावर आता आर्थिक संकट आले होते. अशा परिस्थितीत कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी प्रत्येकाला काम करावे लागत होते. अशा परिस्थितीत वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी अचिंतवरही कमाई करण्याची जबाबदारी आली. अचिंतने जरी साडीत भरतकाम आणि शिवणकाम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो कुशल शिंपी टेलर बनला.
Read Also : भावाला अटक होताच सुनील राऊत म्हणाले, ''खोटी केस...''
वयाच्या 12 व्या वर्षी तो पहिल्यांदा स्थानिक जिममध्ये गेला. अचिंतचा मोठा भाऊ वेटलिफ्टर होता. त्याच्याकडून हा खेळ वारसाहक्काने मिळाला आहे. अचिंतचे वडील हयात असेपर्यंत त्याचा मोठा भाऊ वेटलिफ्टिंगचे काम करत असे. वडिलांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या भावाला कुटुंबासाठी उदरनिर्वाहासाठी वेटलिफ्टिंग सोडून शिवणकाम आणि भरतकाम शिकावे लागले. याप्रकारे अचिंतने भारोत्तोलन आणि शिवणकाम या दोन्ही गोष्टी भावाकडून शिकून घेतल्या.
Read Also : Monkeypox : भारतात मंकीपॉक्सचा पहिला बळी
वडिलांचे निधन झाल्यानंतरच्या काळात जेव्हा अचिंतने वेटलिफ्टिंगला सुरुवात केली तेव्हा त्याचा दिनक्रम खूप कठीण होता. पहाटे पाच वाजता उठून तो धावायला जायचा. यानंतर घरी परतल्यावर तो शिवणकाम करायचा. त्यानंतर जिम आणि नंतर शाळेत जात असे. शाळेतून परतल्यानंतर तो वेटलिफ्टिंगचा सराव करायचा. घरी परतल्यानंतर तो पुन्हा शिवणकाम-भरतकाम करत असायचा. यानंतर रात्रीचे जेवण करून ते 10 वाजता झोपायला जायचे आणि नंतर सूर्य उगवण्यापूर्वीच अंथरुण सोडायचे.
Read Also : आज श्रावणातील पहिला सोमवार, जाणून घ्या शिवशंकराची पूजा विधी
अचिंत चुकून वेटलिफ्टिंगच्या खेळात उतरला. एके दिवशी तो पतंग उडवत होता. मग एक पतंग कापला आणि स्थानिक जिममध्ये गेला. लोकांना व्यायामशाळेत व्यायाम आणि प्रशिक्षण देताना पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्यानंतर तो मोठ्या भावासोबत जिममध्ये जाऊ लागला.
अचिंतची आतापर्यंतची कारकीर्द खूप चांगली राहिली आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला होता. 2019 मध्ये त्याने कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. वरिष्ठ गटातील हे त्याचे पहिले पदक ठरले. 2021 मध्ये त्याने ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. याशिवाय ताश्कंद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले होते.