नवी दिल्ली: कुस्तीपटूंच्या(wrestlers)आंदोलनाने (agitation) क्रीडाविश्वात खळबळ माजवली होती. पण काल रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आणि कुस्तीपटूंमध्ये बैठक झाली. यात खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (Wrestling Federation of India President ) बृजभूषण शरण सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. (Action taken on Brij Bhushan Sharan Singh after 7 hours meeting with Union Sports Minister)
अधिक वाचा : Shani Amavasya 2023: काय आहे शुभ मुर्हूत; गंगा स्नानाची वेळ
लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दणका बसला आहे. तब्बल सात तासाच्या बैठकीनंतर अखेर बृजभूषण शरण सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौकशीपूर्ण होईपर्यंत बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून दूर ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा मोठा निर्णय जाहीर केला. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयानंतर कुस्तीपटूंनी आपलं धरणं आंदोलनही मागे घेतलं.
अधिक वाचा : 2023 मधील शनी अमावस्या, जाणून घ्या पूजा विधी, अमावस्येचा काळ
यासोबतच कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांसदर्भात चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती चार आठवड्यांतच आपला अहवाल सादर करणार आहे. याचबरोबर चौकशी पूर्ण होईपर्यंत हीच समिती कुस्ती संघटनेचं काम पाहणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर भारताच्या कुस्तीपटूंनी त्यांच्याविरोधात एल्गार उभारला होता.
दिल्लीच्या जंतरमंतर बृभुषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन उभारण्यात आले होते. कुस्तीपटूंच्या या आदोलंनामुळे देशभरात खळबळ उडाली. बुधवारी कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिकसहीत 30 कुस्तीपटू धरणे आंदोलनाला बसले होते. शुक्रवारी रात्री उशिरा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंसोबत बैठक केली आणि त्यांच्या मागण्या ऐकल्या. मागण्या ऐकल्यानंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंसोबत पत्रकार परिषद घेत बृजभूषण शरण सिंह यांना हटवण्याचा निर्णय जाहीर केला. बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप या कुस्तीपटूंनी केला होता.
अधिक वाचा : धनुष्यबाण कोणाचा? 30 जानेवारीला अंतिम निर्णय देणार
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंसोबत केलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक देखरेख समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समिती चार आठवड्यांत तपास पूर्ण करेल. समिती WFI आणि तिच्या अध्यक्षांवरील आर्थिक किंवा लैंगिक छळाच्या सर्व आरोपांची गांभीर्याने चौकशी करेल."
या समितीतील सदस्यांची नावे देखील घोषित केली जाणार आहेत. ही समिती चार आठवड्यात आपली चौकशी पूर्ण करणार आहे. अनुराग ठाकूर पुढे बोलताना म्हणाले की, समितीचा तपास पूर्ण होईपर्यंत, बृजभूषण सिंह अध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून दूर राहतील आणि तपासात सहकार्य करतील. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत WFI चे दैनंदिन काम समितीच पाहिल".
आम्ही तब्बल सात तास चर्चा केली. यावेळी कुस्तीपटूंनी कुस्ती संघावरील आरोपांची माहिती दिली. त्यांच्या सर्व मागण्या ऐकण्यात आल्या आहेत. खेळाडूंच्या आरोपानंतर आम्ही डब्ल्यूएफआयला नोटीस बजावली होती. 72 तासात नोटिशीला उत्तर देण्यास सांगितलं होतं, असंही ठाकूर म्हणाले.
बजरंग पुनिया रात्री उशिरा क्रीडामंत्र्यांसोबत झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाले, "क्रीडामंत्र्यांनी आमच्या मागण्या ऐकल्या आणि योग्य तपासाचं आश्वासन दिलं. मी त्यांचे आभार मानतो आणि आम्हाला आशा आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, म्हणून आम्ही सध्या आंदोलन मागे घेत आहोत."
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या सदस्यांमध्ये मेरी कोम, योगेश्वर दत्त, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, सहदेव यादव आणि दोन वकिलांचा समावेश करण्यात आला होता.