नवी दिल्ली : अव्वल भारतीय जलतरणपटू साजन प्रकाशने डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे झालेल्या डॅनिश ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 200 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून हंगामाची सुरुवात केली. या वर्षाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रकाशने शुक्रवारी रात्री 1.59.27 सेकेंदात पोडियममध्ये अग्रस्थान मिळवलं. तत्पूर्वी, केरळच्या जलतरणपटूने हीटमध्ये २.०३.६७ सेकंदांची वेळ नोंदवून 'अ' फायनलसाठी क्वालीफाय झाला होता. दोन वेळचा ऑलिम्पियन प्रकाश म्हणाला, "या महिन्यात आमच्याकडे काही स्पर्धा आहेत. राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांसाठी आम्ही हळूहळू शीर्षस्थानी येण्याचा प्रयत्न करू."
आर माधवनच्या मुलाने केला चमत्कार
वेदांत माधवननेही आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी सुधारण्यासाठी सकारात्मक सुरुवात केली आणि पुरुषांच्या 1500 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. भारतीय अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत याने 10 जलतरणपटूंच्या अंतिम फेरीत 15.57.86 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले. आपल्या मुलाच्या या यशाबद्दल आर माधवनने आनंद व्यक्त केला आहे.
मार्च 2021 मध्ये झालेल्या लॅटव्हिया ओपनमध्ये 16 वर्षांच्या या खेळाडूने कांस्यपदक जिंकले होते. त्याने गेल्या वर्षी ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सात पदके (चार रौप्य आणि तीन कांस्य) जिंकून आपली छाप पाडली होती. महिलांच्या 400 मीटर मेडलेच्या बी फायनलमध्ये शक्ती बालकृष्णनने दुसरे आणि एकूण आठवे स्थानावर राहिली. स्पर्धेत भाग घेणारा चौथा भारतीय जलतरणपटू तनिश जॉर्ज मॅथ्यू 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये 29व्या स्थानावर राहिला.