saina-siddharth: 'त्या' अभिनेत्याने मागितली सायनाची माफी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 12, 2022 | 15:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Siddharth apologies to saina: सिद्दार्थने ट्विटरवर आपले पत्र पोस्ट केले आहे. त्याने लिहिले की, जर एखादा जोक समजून सांगावा लागेल तर तो तो जोक काही चांगली गोष्ट नाही. जोकसाठी सॉरी. मला आशा आहे की हे आपण मागे टाकू शकतो आणि तुम्ही हे माझे लेटर स्वीकाराल. तुम्ही नेहमी माझी चॅम्पियन राहाल.

saina-siddharth
'त्या' अभिनेत्याने मागितली सायनाची माफी 
थोडं पण कामाचं
  • सिद्धार्थने सायना नेहवालची मागितली माफी
  • शेअर केला माफीनामा
  • दुखावण्याचा कोणताही हेतू नसल्याचे केले स्पष्ट 

मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ(south star siddharth) सध्या सायना नेहवालच्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. त्याने सायना नेहवालबाबत(saina nehwal) एक ट्वीट केले होते. यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. ही बाब राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत पोहोचली होती. यानंतर या अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची परस्थिती ओढवली होती. मोठ्या वादविवादानंतर सिद्धार्थने आता स्पष्टीकरण दिले आहे की त्याच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला.त्याने सायना नेहवालची माफी मागितली आहे. Actor Siddharth apologies to saina nehwal on twitter

सिद्धार्थचा माफीनामा

सिद्धार्थने ट्विटरवर आपले पत्र पोस्ट केले आहे. त्याने लिहिले की, जर एखाद्या जोकला समजवावे लागत असेल तर तो जोक चांगली गोष्ट नाही. जोकसाठी सॉरी....हा जोक नीट बसला नाही. मला आशा आहे की हे आपण मागे टाकू शकतो. तसेच तुम्ही माझे हे पत्र स्वीकाराल. तु नेहमीच माझ्यासाठी चॅम्पियन राहशील. 

अभिनेत्याने आपल्या माफीनाम्यामध्ये हे ही म्हटले आहे की त्याचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मी कट्टर नारीवादी समर्थक आहे आणि माझे ट्वीट एखाद्या जेंडरसाठी नव्हते. तसेच तुमच्यावर कोणत्याही प्रकारच्या हल्ला करण्याचा कोणताही हेतू नव्हता. 

सायनाची प्रतिक्रिया

सायना नेहवालने सिद्धार्थच्या या माफीनाम्यावर उत्तर दिले आहे. तिने म्हटले, तुम्हाला अशा पद्धतीने कोणत्याही महिलेला टार्गेट केले नाही पाहिजे. ठीक आहे. मला याची पर्वा नाही. मी आपल्या जागी खुश आहे. भगवान त्यांचे भले करो. 

सायनाने दिली होती प्रतिक्रिया

सिद्धार्थच्या ट्वीटवर आधीही सायना नेहवालचे विधान आले होते. तिने लिहिले, मला नाही माहीत की त्याला काय मेसेज द्यायचा होता. मी एक अभिनेता म्हणून नेहमीच त्याच्या कामाला पसंती दिली आहे. मात्र हे ठीक नव्हते. जर काही म्हणायचे होते तर योग्य शब्दांचा वापर करायला हवा होता. जर पंतप्रधानांची सुरक्षाहा काही मुद्दा नाही तर देशात काय सुरक्षित आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी