Under 19 World Cup 2022: अफगाणिस्तानचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय, सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी भिडणार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 28, 2022 | 14:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

U19 cricket world cup 2022: अफगाणिस्तानच्या अंडर १९ संघाने श्रीलंकेला हरवत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

afganistan
U19WCअफगाणचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय, सेमीफायनलमध्ये एंट्री 
थोडं पण कामाचं
  • अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप २०२२
  • अफगाणिस्तानने श्रीलंकेला हरवले
  • पुढील सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळणार

मुंबई: अफगाणिस्तानने(afganistan) आपल्या गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजमध्ये(west indies) सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्डकप २०२२(u19 cricket world cup)च्या सुपर लीग क्वार्टर फायनलमध्ये(quarter final) उलटफेर पाहायला मिळाली. अफगाणिस्तानच्या युवा क्रिकेटर्सनी श्रीलंकेविरुद्ध चार धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि आपल्या संघाला स्पर्धेत सेमीफायनल गाठून दिली. सेमीफायनलमध्ये आता अफगाणिस्तानचा सामना इंग्लंडच्या संघाशी होणार आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ १३४ धावा केल्या आणि असे वाटत होते की श्रीलंकेचा संघ आरामात सेमीफायनलमध्ये पोहोचेल. Afganistan beat srilanka in Under 19 World Cup 2022 and enter in semmifinal

मात्र अफगाणिस्तानच्या युवा संघाने हिम्मत हरली नाही आणि आपला संघर्ष कायम ठेवला. गोलंदाजांनी हे सोपे आव्हान श्रीलंकेसाठी कठीण केले. त्यांनी ४३ धावांवर श्रीलंकेच्या ७ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दरम्यान, खालच्या फळीतील फलंदाजांनी हे आव्हान पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र श्रीलंकेचा संघ ४६ ओव्हरमध्ये १३० धावांपर्यंतच पोहोचू शकला. 

अधिक वाचा -विद्यार्थ्यांसाठी आज बिहार बंद, कडेकोट पोलीस बंदोबस्त

श्रीलंकेचा कर्णधार दुनिथ वेलागेने ३४ आणि रवीन डी सिल्वाने २१धावा केल्या. याशिवाय त्यांचा सलामीवीर चामिंदुने १६ आणि विनुजा रनपूलने ११ धावा करून नाबाद राहिला. याशिवाय कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. अफगाणिस्तानच्या बोर से बिलाल समीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. याशिवाय नूर अहमदने १० ओव्हरमध्ये २० धावा खर्च केल्या आणि त्यांना यश मिळाले. नूरला त्याच्या गोलंदाजीसाठी मॅन ऑफ दी मॅचसाठी निवडण्यात आले. अफगाणिस्तानकडून अब्दुल हादीने ९७ चेंडूत ३७ धावा केल्या. याशिवाय नूर अहमदने ३३ चेंडूत ३० धावांची शानदार खेळी केली. तर अल्लाह नूरने २५ धावांचे योगदान दिले. 

अधिक वाचा - महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात

भारताची बांगलादेशशी टक्कर

भारताचा पुढील सामना गतविजेत्या बांगलादेशसोबत होणार आहे. हा सामना २९ जानेवारीला कुलिज क्रिकेट ग्राउंड अँटिग्वा येथे खेळवला जाईल. विशेष म्हणजे चार वेळा जेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाने सुपर लीगच्या टप्प्यात एकाही सामन्यात पराभव न पत्करता प्रवेश केला आहे. भारतीय संघाने तीनही सामने जिंकत ग्रुप बीमध्ये अव्वल स्थान पटकावले. आता गतविजेत्या बांगलादेशशी सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी