अपघातातून थोडक्यात बचावला 'हा' क्रिकेटर 

Cricketer suffers injury after accident: अफगाणिस्तानच्या डेब्यु टेस्टमध्ये खेळणाऱ्या विकेटकीपर आणि बॅट्समनचा अपघात झाला आहे. या कार अपघातामधून विकेटकीपर आणि बॅट्समन जजई थोडक्यात बचावला. 

afghanistan wicketkeeper afsar zazai
अफसर जजईचा कार अपघात 

थोडं पण कामाचं

  • अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा विकेटकीपर बॅट्समन अफसर जजई 
  • कार अपघातातून थोडक्यात बचावला अफसर जजई
  • अफसर जजई याने अफगाणिस्तान क्रिकेट टीमसाठी ३ टेस्ट, १ टी-२० आणि १७ वनडे मॅचेस खेळल्या आहेत

काबूल: अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा (Afghanistan Cricket Team) विकेटकीपर आणि बॅट्समन अफसर जजई (Afsar Zazai) याचा शनिवारी एक कार अपघात (Car Accident) झाला. हा अपघात खूपच भीषण होता. अपघातात अफसर जजई याच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातातून अफसर जजई हा थोडक्यात बचावला आहे. अफसर जजई याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

अफसर जजई याचा कार अपघात झाल्याची माहिती स्थानिक पत्रकार आणि अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे माजी मीडिया व्यवस्थापक इब्राहिम मोमंद यांनी दिली आहे. अफसर जजई याला अपघातात दुखापत झाल्याचं सांगत इब्राहिम यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अफसर जजई याची अपघातग्रस्त कार आणि त्यासोबतच अफसर याचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, अफसरच्या डोक्याला दुखापत झाल्याने पट्टी बांधली आहे. 

अफसर जजईची कारकीर्द 

२६ वर्षीय अफसर जजई याने अफगाणिस्तान क्रिकेट टीमसाठी आतापर्यंत ३ टेस्ट मॅचेस, एक टी-२० मॅच आणि १७ वन-डे मॅचेस खेळल्या आहेत. ३ टेस्ट मॅचेसमधील सहा इनिंगमध्ये अफसरने १३५ रन्स केल्या. एका टी-२० मॅचमध्ये त्याने ९ रन्स केल्या आहेत. तर १७ वन-डे मॅचेसमध्ये अफसर जजई याने १७.६०च्या सरासरीने २६४ रन्स केल्या आहेत आणि यामध्ये २ हाफसेंच्युरीचाही समावेश आहे. त्याचा सर्वाधिक स्कोअर हा ६० रन्स इतका आहे.

अफसर जजई याने २०१८ साली भारतीय टीमच्या विरुद्ध बंगळुरू येथे अफगाणिस्तानच्या डेब्यु टेस्टमध्ये एन्ट्री केली होती. तर गेल्यावर्षी वेस्ट इंडिज क्रिकेट टीम विरुद्ध लखनऊ येथे टेस्ट सीरिजमध्ये खेळताना तो दिसला होता. वनडे टीममधून अफसर जजई हा २०१७ पासून बाहेर आहे. तर २०१३ साली अफसर जजई याने अफगाणिस्तान क्रिकेट टीमसाठी एकमेक टी-२० मॅच खेळली होती. 

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट सुद्धा बंद आहे आणि त्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेटर सुद्धा घरीच आहेत. जगभरातील सर्व क्रिकेटर्स पुन्हा क्रिकेट कधी सुरू होईल याची वाट पाहत आहेत. तर राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्यासारखे क्रिकेटर्स काबूल येथील स्टेडियमवर प्रॅक्टिस करत आहेत. तेथे  क्रिकेटर्ससाठी एका महिन्याचा ट्रेनिंग कॅम्प आयोजित करण्यात आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी