Mondli Khumalo in serious condition । मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी अंडर-१९ गोलंदाज मोंडली खुमालो याच्यासोबत इंग्लंडमध्ये मारहाणीची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ब्रिजवॉटर येथील एका पबबाहेर ही धक्कादायक घटना घडली. या मारहाणीमुळे खुमालो गंभीर जखमी झाला असून सध्या तो गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रक्तस्त्राव देखील झाला आहे. खुमालो याच्यावर आतापर्यंत उपचारादरम्यान दोन ऑपरेशन करण्यात आली आहेत. तो सध्या कोमात गेला आहे. खुमालोला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. (African bowler Mondli Khumalo beaten outside a pub in England).
अधिक वाचा : या लोकांच्या घरातील तिजोरीत नेहमीच असते भरभराट
ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, २० वर्षीय खुमालोचा दक्षिण आफ्रिकेतील क्वा-झुलु नॅटल इनलँडसोबत करार आहे. तो नॉर्थ पीटरटन क्रिकेट क्लबकडून खेळण्यासाठी व्यावसायिक खेळाडू म्हणून इंग्लंडमध्ये आला होता. मागील आठवड्यात हा संघ विजय साजरा करण्यासाठी बाहेर पडला होता आणि त्याचवेळी खुमालोसोबत ही घटना घडली. खुमालो जागीच बेशुद्ध पडला आणि त्याला तातडीने उपचारासाठी साऊथमीड रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नॉर्थ पीटरटन क्लब आणि खुमालोचे एजंट रॉब हम्फ्रीज ज हे गोलंदाजाच्या कुटुंबाला इंग्लंडमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हम्फ्रीज म्हणाले की, "मोंडली खुमालो एक चांगला व्यक्ती आहे. त्याच्यासोबत असे कसे घडू शकते यावर त्याच्या आईचा विश्वास बसत नाही. नॉर्थ पीटरटनमधील प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करतो. तो एक सुंदर मुलगा आहे. तो येथे खूप छान वेळ घालवत आहे. त्याने चांगली गोलंदाजी केली आणि तो एक चांगला खेळाडू म्हणून क्लबचा भाग झाला होता.
दरम्यान, खुमालोने २०२० मध्ये अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने चार प्रथम श्रेणी सामन्यांशिवाय, एक लिस्ट ए आणि चार देशांतर्गत टी-२० सामने खेळले आहेत. त्याला २०२२-२३ हंगामासाठी क्वा-झुलु नॅटल इनलँडशी करारबद्ध करण्यात आले. मात्र खुमालो यांला भविष्यात आणखी काही काळ उपचारांची गरज आहे का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.