BWF 2022: मुलाला पार्टनर न मिळाल्याने ६४ वर्षीय आईच उतरली कोर्टात

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 25, 2022 | 16:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Badminton World Championships: ६४ वर्षीय बॅडमिंटन खेळाडू स्वेतलानाने इतिहास रचला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये स्वेतलानाने ३३ वर्षाच्या मुलाला पार्टनर न मिळत असल्याने ती खुद्द मैदानात उतरली. आई-मुलाच्या जोडीने मिक्स डबल्समध्ये इजिप्तच्या हतेम अलगामल आणि दोहाच्या संघाला २-१ असे हरवले. 

badminton
मुलाला पार्टनर न मिळाल्याने ६४ वर्षीय आईच उतरली कोर्टात 
थोडं पण कामाचं
  • स्वेतलानाने २००९मध्ये पदार्पण केले होते. 
  • स्वेतलाना आणि मीसा दोघांनी हैदराबादमध्ये झालेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये धमाल गाजवली होती. 
  • मीसाची आई स्वेतलानाने युरोपियन चॅम्पियनशिप १९८६मध्ये कांस्य पदक पटकावले होते. 

मुंबई: टोकियो बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एक अनोखे चित्र पाहायला मिळाले. येथे ६४ वर्षांची आई आणि तिचा ३३ वर्षीय मुलाहने इस्त्राईलला जिंकून दिले. खरंतर, बॅडमिंटन प्लेयर मीसाची आई स्वेतलानाने मुलाला कोणीही पार्टनर मिळत नसल्याने ती खुद्द मैदानात उतरली. त्यांनी इजिप्तच्या हतेम अलगामल आणि दोहाच्या संघाला २-१ असे हरवले. पहिला सामना जिंकण्याचा आई-मुलाचा अनुभव शानदार होता. After not getting partner for son in badminton a mother became badminton player

अधिक वाचा - गर्लफ्रेंड परीक्षेत नापास होताच बॉयफ्रेंडने केलं असं काही...

मीसाने २००९मध्ये पदार्पण केले होते. तेव्हा त्याची आई स्वेतलानाचे वय ५१ वर्षे होते आणि ती स्वत: २० वर्षांची होती. आई-मुलाने हैदराबादमध्ये झालेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये धमाल केली होती. मीसाच्या आईने युरोपियन चॅम्पियनशिप १९८६मध्ये कांस्यपदक जिंकले होते. 

स्वेतलानाला ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचाय

ऑलिम्पिकमध्ये आपल्या मुलासह खेळण्याचे स्वेतलानाचे स्वप्न आहे. तिने सांगितले की ती आगामी खेळात चांगली कामगिरी करणार आणि ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण करणार. तिने सांगितले की इस्त्राईलमध्ये जास्त बॅडमिंटन खेळाडू नाहीत. इस्त्राईलमध्ये एकही बॅडमिंटन ट्रेनिंग सेंटर नाही. जेव्हा सराव करायचा असतो तेव्हा लोक महिन्यातून एकदा जमा होतात आणि ३-४ तास ट्रेनिंग करतात. 

स्वेतलाना आणि तिचा मुलगा दररोज ३-४ तास सराव करतात. साधारण ४० वर्षानंतर स्वेतलाना सर्वाधिक वयात बॅडमिंटनचा सामना जिंकणारी खेळाडू बनली आहे. आधी मीसाने म्हटले की ३० वर्षाच्या वयात ते रिटायरमेंटबाबत विचार करत होते मात्र त्याच्या आईच्या प्रेरणेने त्याला आतापर्यंत खेळात टिकून राहण्यास मदत केली आहे. त्याने सांगितले, माझी आई इतक्या वयातही खेळत आहे त्यामुळे मी कदाचितच रिटायर होणार नाही. मीसा सध्या जगातील ४७व्या क्रमांकावरील खेळाडू आहे. 

अधिक वाचा - धाड टाकण्यापूर्वी आयकर विभागाच्या गाडीवर होते 'हे' बोर्ड

मोठे काहीतरी करण्याचे स्वप्न

मीसाची आई स्वेतलानाने सांगितले की एक दिवस आम्ही जरूर मोठे काही करू. आम्हाला चीन आणि द. कोरियासारख्या संघांना हरवण्यासाठी खेळत आहोत. त्याने सांगितले की आम्ही खेळताना निकालाबाबत विचार करत नाही तर खेळावर लक्ष केंद्रित करतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी