Pak vs aus: फिक्सिंग करूनही पाकिस्तानचा पराभव, सोशल मीडियावर पाकची खिल्ली

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 12, 2021 | 13:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये आता न्यूझीलंडशी सामना होणार आहे. याआधी न्यूझीलंडने इंग्लंडला हरवत फायनल गाठली. १४ नोव्हेंबरला फायनलचा सामना रंगणार आहे.

australia
Pak vs aus: फिक्सिंग करूनही पाकिस्तानचा पराभव 
थोडं पण कामाचं
  • या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.
  • टी-२० वर्ल्डकपमधील खूपच रोमहर्षक सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात झाला.
  • पाकिस्तानने विजयासाठी दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १९ षटकांतच पूर्ण केले

मुंबई: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने(australia cricket team) टी-२० वर्ल्डकप २०२१(t-20 world cup 2021)च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये(semifinal) पाकिस्तान संघाला(pakistan team) पराभवाची धूळ चारत दिमाखात फायनलमध्ये(final) प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाचा(australia) फायनलमध्ये आता न्यूझीलंडशी(new zealand) सामना होणार आहे. याआधी न्यूझीलंडने इंग्लंडला हरवत फायनल गाठली. १४ नोव्हेंबरला फायनलचा सामना रंगणार आहे. पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाने नॉकआऊट सामन्यात आपला विजयी रथ कायम ठेवला. या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. टी-२० वर्ल्डकपमधील खूपच रोमहर्षक सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात झाला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १९ षटकांतच पूर्ण केले. शेवटच्या षटकांमध्ये मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस यांनी जबरदस्त खेळ केला आणि पाकिस्तान चक्रावून गेला. मॅथ्यू वेडच्या जबरदस्त फटकेबाजीसमोर पाकिस्तानी गोलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले.  

सामन्याच्या सुरूवातीला आरोन फिंचने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानी संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७७ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली नाही. मात्र अखेरच्या काही षटकांमध्ये मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस यांनी आपल्या संघाला ५ विकेटनी जिंकवत फायनला पोहोचवलेत. 

पाकिस्तानचे दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. पाकिस्तान भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनीही जल्लोष केल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळाले. उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडू लागला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी