RCB New Captain : विराट कोहलीनंतर आता हा खेळाडू असणार RCB चा नवा कर्णधार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 13, 2022 | 13:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

RCB New Captain 2022 | जगभरातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग आपल्या आगामी १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे. लक्षणीय बाब म्हणजे आगामी आयपीएलचा हंगाम खूप महत्त्वपूर्ण आणि पाहण्याजोगा असणार आहे. कारण १५ व्या हंगामासाठी आयपीएलच्या लीगमध्ये अहमदाबाद आणि लखनऊ अशा नवीन दोन संघाचा समावेश होणार आहे

After Virat Kohli's resignation Glenn Maxwell will be the new captain of RCB
विराटच्या राजीनाम्यानंतर हा खेळाडू आरसीबीचा कर्णधार असणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जगभरातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग आपल्या आगामी १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे.
  • आरसीबीच्या संघाचा माजी कर्णधार असलेल्या कोहलीने त्याच्या एका निवेदनात म्हटले होते की, "एक कर्णधार म्हणून त्याचे शेवटचे वर्ष आहे पण तो नेहमीच आरसीबीकडून खेळणार आहे.
  • आरसीबीच्या संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलकडे सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

RCB New Captain 2022 | नवी दिल्ली : जगभरातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) आपल्या आगामी १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे. लक्षणीय बाब म्हणजे आगामी आयपीएलचा हंगाम खूप महत्त्वपूर्ण आणि पाहण्याजोगा असणार आहे. कारण १५ व्या हंगामासाठी आयपीएलच्या लीगमध्ये अहमदाबाद आणि लखनऊ (Ahmedabad And Lucknow)अशा नवीन दोन संघाचा समावेश होणार आहे. तर हंगामाच्या पूर्वसंध्येला कित्येक खेळाडूंचा लिलाव होणार आहे. आगामी आयपीएलच्या हंगामात एकूण १० संघाचा सहभाग असेल. दरम्यान आयपीएल २०२२ ची सुरूवात २ एप्रिलपासून होणार आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात नव्या हंगामाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान आयपीएल मधील सर्वात लोकप्रिय असलेल्या संघापैकी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (Royal Challengers Bangalore) संघात खूप बदल झाला आहे. कारण बंगळुरूच्या संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मागील हंगामातच संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता आरसीबीच्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा कोणाकडे सोपवली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (After Virat Kohli's resignation Glenn Maxwell will be the new captain of RCB). 

विराटनंतर हा खेळाडू होणार बंगळुरूचा नवा कर्णधार

आरसीबीच्या संघाला आयपीएलच्या इतिहासात एकदाही जेतेपदाचा किताब पटकावता आला नसला तरी बंगळुरूचा संघ खूप लोकप्रिय आहे आणि त्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. या संघात जगभरातील अनेक मोठ्या खेळाडूंचा सहभाग राहिला आहे. आरसीबीच्या संघाचा माजी कर्णधार असलेल्या कोहलीने त्याच्या एका निवेदनात म्हटले होते की, "एक कर्णधार म्हणून त्याचे शेवटचे वर्ष आहे पण तो नेहमीच आरसीबीकडून खेळणार आहे." यामुळे सध्या विराट कोहली आरसीबी संघात आहे मात्र तो संघाचा कर्णधार नाही, त्यामुळे लवकरात लवकर संघासाठी नवीन कर्णधार शोधण्याचा प्रश्न संपूर्ण संघ व्यवस्थापनासमोर आला आहे.

विराटच्या जागी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅक्सवेल असणार कर्णधार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हा आयपीएलमधील सर्वोत्तम संघ मानला जातो. जेव्हापासूनच आयपीएलची स्पर्धा सुरू झाली आहे तेव्हापासून आरसीबीच्या संघाचे अनेकांकडे कर्णधारपद राहिले आहे. दरम्यान आता संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडले आहे, त्यामुळे आरसीबीच्या संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलकडे (Glenn Maxwell) सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कांगारूचा खेळाडू असलेल्या मॅक्सवेलकडे कर्णधारपदाचा खूप अनुभव आहे, त्यामुळे बंगळुरूच्या कर्णधारपदी त्याची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी