एअर इंडिया टी -20 स्पर्धा : डेटामॅटिक्स, व्हीएनएस ग्लोबल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एअर इंडिया विजयी 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 16, 2019 | 12:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

एअर इंडियाच्या वतीने आयोजित टी-२० क्रिकेट इन्व्हिटेशन स्पर्धेच्या दुसऱ्या राउंडच्या दुसऱ्या सामन्यात  डेटामॅटिक्स, व्हीएनएस ग्लोबल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एअर इंडियाने विजय मिळविला आहे.

AIR INDIA T-20 INVITATION CRICKET TOURNAMENT
एअर इंडिया टी -20 इन्व्हिटेशन क्रिकेट टूर्नामेंटमध्ये एअर इंडियाच्या दिवाकर शेट्टी यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात आले.  

मुंबई :  एअर इंडियाच्या वतीने आयोजित टी-२० क्रिकेट इन्व्हिटेशन स्पर्धेच्या दुसऱ्या राउंडच्या दुसऱ्या सामन्यात  डेटामॅटिक्स, व्हीएनएस ग्लोबल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एअर इंडियाने विजय मिळविला आहे. डेटा मॅटिक्सने एलआयसीचा १० विकेटने पराभव केला. व्हीएनएस ग्लोबलने महिंद्रा अँड महिंद्राचा ७ विकेटने पराभव केला. मुंबई पोर्ट ट्रस्टने एनकेजीएसबी बँकेचा २१ धावांनी पराभव केला. एअर इंडियाने अत्यंत थरारक सामन्यात मुंबई फायर ब्रिगेडचा ४ धावांनी पराभव केला. 

 
डेटा मॅटिक्सने एलआयसीचा १० विकेटने केला पराभव 

  1. डेटा मॅटिक्सने नाणेफेक जिंकून एलआयसीला फलंदाजीस पाचारण केले. एलआयसीचा डाव १९.२ षटकात ७७ धावांत गुंडाळला गेलेला. डेटामॅटिक्सकडून रितेश पालव याने ४ तर रोहिदास कोयांडे याने ३ विकेट घेतल्या. त्यानंतर ७७ धावांचा पाठलाग करताना रोहिदास कोयांडे याने ४९ आणि स्वप्निल सावंत याने २६ धावा करत १० विकेटने विजश्री संपादन केला. 
  2. मॅन ऑफ द मॅच -  रोहिदास कोयांडे 

मॅन ऑफ द मॅच -  रोहिदास कोयांडे 

व्हीएनएस ग्लोबलने महिंद्रा अँड महिंद्राचा ७ विकेटने  केला पराभव 

  1. महिंद्रा अँड महिंद्राने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना १८. १ षटकात सर्वबाद १०७ धावा केल्या. रोहन काळभोर याने सर्वाधिक २८ धावा केल्या. तर व्हीएनएस ग्लोबलकडून केतन खरात याने ३, अजिंक्य धुमाळ याने ३ आणि किरण देसाई याने २ विकेट घेतल्या. महिंद्रा अँड महिंद्राच्या १०७ धावांचा पाठलाग करताना व्हीएनएस ग्लोबलकडून अजिंक्य पाटील याने ६५ धावा केल्या. व्हीएनएस ग्लोबलने हा सामना सात गडी राखून खिशात घातला. 
  2. मॅन ऑफ द मॅच - अजिंक्य पाटील 

\

मॅन ऑफ द मॅच - अजिंक्य पाटील 

 

मुंबई पोर्ट ट्रस्टने एनकेजीएसबी बँकेचा २१ धावांनी केला पराभव 

  1. एनकेजीएसबी बँकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.  मुंबई पोर्ट ट्रस्टने १५ षटकात ७ बाद ९९ धावांचे आव्हान ठेवले. हर्षल जाधव ३१ आणि ओंकार तोंडे याने २६ धावा केल्या. सिद्धेश पिंगे याने एनकेजीएसबी बँकेकडून २ विकेट घेतल्या. एनकेजीएसबी बँकेने हे सोपे आव्हान पेलता आले नाही. एनकेजीएसबी बँकेला १५ षटकात ९ बाद ७८ धावा करता आल्या. मुंबई पोर्ट ट्रस्टने एनकेजीएसबी बँकेचा २१ धावांनी पराभव केला. 
  2. मॅन ऑफ द मॅच -  हर्षल जाधव 

 

मॅन ऑफ द मॅच -  हर्षल जाधव 

 

एअर इंडियाने अत्यंत थरारक सामन्यात मुंबई फायर ब्रिगेडचा ४ धावांनी केला पराभव 

  1. एअर इंडियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १३८ धावा केल्या.  एअर इंडियाकडून दिवाकर शेट्टी २३ आणि आदित्य पांडे २० धावा केल्या.  मुंबई फायर ब्रिगेडने १३८ धावांचा पाठलाग करताना निर्धारित २० षटकात ९ बाद १३४ धावा करता आल्या. एअर इंडियाकडून रुचित जानी, आदित्य पांडे, अभिषेक पाटील, एम.बी. मुदलीयार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर दिवाकर शेट्टी याने १ विकेट घेतली. 
  2. मॅन ऑफ द मॅच - दिवाकर शेट्टी
  3.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
एअर इंडिया टी -20 स्पर्धा : डेटामॅटिक्स, व्हीएनएस ग्लोबल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एअर इंडिया विजयी  Description: एअर इंडियाच्या वतीने आयोजित टी-२० क्रिकेट इन्व्हिटेशन स्पर्धेच्या दुसऱ्या राउंडच्या दुसऱ्या सामन्यात  डेटामॅटिक्स, व्हीएनएस ग्लोबल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एअर इंडियाने विजय मिळविला आहे.
Loading...
Loading...
Loading...